Amitabh Bachchan: 'बकवास करण्याची एक रेखा...' अमिताभ बच्चन यांची रात्री उशीरा पोस्ट अन् सोशल मीडियावर खळबळ
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Amitabh Bachchan:बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 82 व्या वर्षीही खूप एनर्जेटिक असतात. नेहमीच त्यांचा उत्साह आणि काम करण्याची इच्छा लोकांना प्रेरणा देत असते.
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 82 व्या वर्षीही खूप एनर्जेटिक असतात. नेहमीच त्यांचा उत्साह आणि काम करण्याची इच्छा लोकांना प्रेरणा देत असते. या वयातही ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकतीच अमिताभ यांनी रात्री उशीरा एक पोस्ट शेअर केली ज्यावरुन सध्या त्यांना ट्रोल केलं जातंय.
अमिताभ यांनी त्यांच्या X अकाउंटवर पोस्ट शेअर करत लिहिलं, "नंतर मला जाणवलं, की विश्व माझ्या कवटीत आहे."ही ओळ पाहून अनेकजण थक्क झाले, तर काहींनी या ‘फिलॉसॉफिकल’ विचारांवर विनोद करण्याची संधी सोडली नाही.
एका युजरने लिहिलं, "साहेब, विश्व लहान झालंय का कवटी मोठी झालीय?" तर दुसरा म्हणाला, “काका, पुरे झाले, म्हातारपणात बडबड करण्यालाही एक रेखा असते." इतकंच नाही, काहींनी तर जया बच्चन यांचा उल्लेख करत मजेशीर टोले लगावले. मात्र, बिग बी यांनी नेहमीप्रमाणे एकाही ट्रोलला उत्तर दिलं नाही.
advertisement
अमिताभ बच्चन हे रात्री उशिरा पोस्ट करणारे सेलिब्रिटी म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पहाटे 2:30 वाजता एक पोस्ट केली होती, “वर पाहिले, आजूबाजूला पाहिले, संपूर्ण विश्व हादरले.” त्या वेळीही लोकांनी त्यांना “बिग बी, झोपा आता” असा सल्ला दिला होता.

amitabh bachchan
advertisement
दरम्यान, लवकरच ‘कल्की 2898 एडी भाग 2’ मध्ये झळकणार आहेत. तसेच फरहान अख्तरच्या ‘120 बहादुर’ या चित्रपटात त्यांचा दमदार व्हॉइसओव्हर ऐकायला मिळणार आहे ही माहिती त्यांनी KBC 11 वर स्वतः दिली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 5:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Amitabh Bachchan: 'बकवास करण्याची एक रेखा...' अमिताभ बच्चन यांची रात्री उशीरा पोस्ट अन् सोशल मीडियावर खळबळ