advertisement

'महाराजांच्या किल्ल्यावरून माझा कडेलोट करा पण...', दिव्या शिंदेचा 'बिग बॉस'वर हल्लाबोल, निर्मात्यांनाच उभं केलं आरोपीच्या पिंजऱ्यात

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 Divya Shinde Controversy: एका रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर नक्की काय चालतं, याचे दिव्याने केलेले खुलासे ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

News18
News18
मुंबई : 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातून ज्या 'तलवार' प्रकरणाने दिव्या शिंदेची एक्झिट झाली, त्या वादाने आता एका वादळाचं रूप घेतलं आहे. घराबाहेर पडल्यावर दिव्या गप्प बसली नाही. "बाहेर गेल्यावर तलवार चालवेन" या एका वाक्यावरून दिव्याला शोमधून हाकलण्यात आलं खरं, पण आता तिने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन थेट निर्मात्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. एका रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर नक्की काय चालतं, याचे दिव्याने केलेले खुलासे ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
पत्रकार परिषदेत दिव्याचा एक वेगळाच आक्रमक आणि करारी बाणा पाहायला मिळाला. डोळ्यांत पाणी असूनही तिचा आवाज खंबीर होता. ती म्हणाली, "मी जे बोलले त्याची जबाबदारी मी ठामपणे घेतेय आणि मरेपर्यंत घेत राहिन. जर संपूर्ण महाराष्ट्राला मी चुकीची वाटत असेन, तर मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही यावर मी ठाम आहे. मला जर शिक्षा देत असाल, तर शिवाजी महाराजांच्या एखाद्या किल्ल्यावरून माझा कडेलोट करावा, अशी माझी इच्छा आहे. पण मी अपमानाला सामोरी जाणार नाही. मी स्वाभिमानाने मरेन हा माझा शेवटपर्यंत पण असेल. मी जे बोलले त्याची जबाबदारी मी घेतेय. शोमध्ये मला पूर्ण बोलू दिलं नाही. तरीही मी एक्सप्लेन करत राहिले." अपमानापेक्षा मृत्यू पत्करण्याची तिची ही भाषा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
advertisement

दिव्या शिंदेचे बिग बॉसच्या निर्मात्यांवर आरोप

नॅशनल टेलिव्हिजनवर हिंसेची भाषा केल्याचा ठपका ठेवत तिला बाहेर काढलं गेलं, त्यावर दिव्याने स्पष्टीकरण दिलं. "माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला गेला. या संविधानाने चालणाऱ्या देशात कोणी खरंच तलवार घेऊन कोणाला मारायला निघणार आहे का? जे लोक वैचारिक आहेत, त्यांच्यासाठी तलवार ही शाब्दिक असते, स्वाभिमानाची असते. हा माझ्या माजाचा आणि मानाचा विषय होता. मी बिग बॉसला शंभर वेळा सांगितलं की मला घराबाहेरचं बोलायला लावू नका, मला पोक करू नका, पण त्यांनी जाणीवपूर्वक मला कोपऱ्यात ढकललं. तिथे कोणीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतं."
advertisement
दिव्याने बिग बॉसच्या 'क्रिएटिव्ह टीम'वर गंभीर आरोप केले आहेत. तिने दावा केला की, अनेक महत्त्वाची फुटेज प्रेक्षकांपासून लपवण्यात आली. "मी स्वतःहून कन्फेशन रूममध्ये जाऊन सांगितलं होतं की मला हा शो सोडायचा आहे. इथे माझ्या स्वाभिमानाला धक्का लागतोय. पण त्यांनी हे कधीच दाखवलं नाही." असा दावा तिने केला. राकेश बापट, ओमकार राऊत आणि करण सोनावणे यांनी दिव्याची बाजू समजून घेतली होती. राकेशने तर चक्क बिग बॉसला विनंती केली होती की दिव्याची मानसिक स्थिती समजून घ्या. मात्र, निर्मात्यांनी यातील कोणतंही फुटेज दाखवलं नाही, असं दिव्याचं म्हणणं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना दिव्याचे डोळे पाणावले होते. आपली बाजू मांडण्याची संधी न दिल्याचं दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट होतं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'महाराजांच्या किल्ल्यावरून माझा कडेलोट करा पण...', दिव्या शिंदेचा 'बिग बॉस'वर हल्लाबोल, निर्मात्यांनाच उभं केलं आरोपीच्या पिंजऱ्यात
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement