एकेकाळचा हिट शो पण 'हास्यजत्रा' सुरू होताच का पडला 'चला हवा येऊ द्या'चा TRP?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Chala Hava Yeu Dya TRP : कोरोना काळात चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कॉमेडी शो सोनी मराठी वाहिनीवर सुरू झाला. महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू होताच काही महिन्यातच चला हवा येऊ द्या या शोचा TRP हळू हळू कमी होऊ लागला.
मुंबई : मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा एकमेव शो होता म्हणजे चला हवा येऊ द्या. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे, डॉ. निलेश साबळे या विनोदवीरांनी प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन केलं. तब्बल 12-14 वर्ष हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहिला.
रिअलिटी शो म्हटलं की स्पर्धा ही आलीच. कोरोना काळात चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कॉमेडी शो सोनी मराठी वाहिनीवर सुरू झाला. महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू होताच काही महिन्यातच चला हवा येऊ द्या या शोचा TRP हळू हळू कमी होऊ लागला.
advertisement
चला हवा येऊ द्या या शो पाहणारा प्रेक्षक आपसूकच महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहू लागला. एकेकाळी हिटचा टीआरपी महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू असताना अचानक हा खाली पडला याचा खुलासा झाला. अभिनेते आणि विनोदवीर भाऊ कदम यांनी याबद्दल भाष्य केलं आहे.
भाऊ कदम यांनी रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत चला हवा येऊ द्याचा टीआरपी कमी झाल्याने आयुष्यात काही फरक पडला का असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर दिलं भाऊ कदम म्हणाले,"टीआरपी कमी झाल्याचा आमच्या आयुष्यावर असा काही परिणाम झाला नाही. पण, त्यापलीकडे मी एक विचार केला. अशा गोष्टी घडतात तेव्हा मी सर्व अंदाज घेतो. याचा थोडा वेगळ्या पद्धतीने विचार केला.”
advertisement
भाऊ कदम पुढे म्हणाले, “‘चला हवा येऊ द्या’ची स्क्रिप्ट अनेक वर्षे एकच माणूस लिहित होता.याच काळात दुसऱ्या एका चॅनेलवर सुद्धा कॉमेडी शो सुरू होता. पण, तिथे लेखक वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे व्हेरिएशन होते. आमच्याकडे एकच माणूस लिहित असल्यामुळे व्हेरिएशन किती येणार."
"आता आपण केलेलं सगळंच हिट होतं असं नाहीये. कोणतीच प्रक्रिया अशी नसते. आपण केलेली प्रत्येक गोष्ट हिट होत नाही तसंच आपलं प्रत्येक स्किट वाजेलच असं नाही. कुठेतरी अपयश ही यशाची पायरी असते. त्यामुळे खाली आल्यावरच आपण पुन्हा वर जातो, यातही एक वेगळी मजा येते.”
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 26, 2024 1:36 PM IST