Bhau Kadam : भाऊ कदम उतरणार निवडणुकीच्या प्रचारात, कुणासाठी मतं मागणार?

Last Updated:

Bhau Kadam will star campaign : सयाजी शिंदे यांच्यानंतर आता कॉमेडियन अभिनेते भाऊ कदम देखील निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. भाऊ कदम आता नक्की कोणासाठी मत मागणार?

भाऊ कदम
भाऊ कदम
मुंबई : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. निवडणुकांना काही दिवस शिल्लक असताना अनेक प्रचाराला देखील वेग आला आहे. अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या प्रचारासाठी कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. काही दिवसांआधी अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतला. सयाजी शिंदे यांच्यानंतर आता कॉमेडियन अभिनेते भाऊ कदम देखील निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. भाऊ कदम आता नक्की कोणासाठी मत मागणार?
काही दिवसांआधी अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आणखी कोणते मराठी कलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अभिनेता कॉमेडियन भाऊ कदम अजित पवार यांचा प्रचार करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
अभिनेते भाऊ कदम अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. भाऊ कदम प्रचार रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. लाडकी बहिण योजनेसह विवाह योजनांची माहिती भाऊ कदम प्रचार रॅलीच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार आहेत. राज्यभरात भाऊ कदम यांच्या प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
अजित पवार यांचे स्टार प्रचारक झाल्यानंतर भाऊ कदम यांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला. भाऊ कदम म्हणाले, ''अजित पवार यांच्या पक्षाच्या प्रचार करायला मिळणार आहे याचा आनंद होत आहे. त्यांनी कलाकारांसाठी खूप काही केलं आहे. अनुदान दिलं आहे. कलाकारांच्या अनेक गोष्टी सॉल्व्ह केल्या. लाडकी बहिण योजनासारखी योजना त्यांनी आणली त्यामुळे त्यांचा स्टार प्रचारक व्हायला मला नक्की आवडेल.''
advertisement
स्टार प्रचारक होण्यासाठी अजित दादांचा पक्षच का निवडला असा प्रश्न विचारला असता भाऊ कदम म्हणाले, ''एकच वादा आमचा दादा, ते काम करणारे नेते आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत ते काम करत असतात. देशासाठी चांगला विचार आणि महाराष्ट्रां भलं करणारे ते नेते आहेत. त्यामुळेच अजित दादांचा स्टार प्रचारक व्हायचं ठरवलं.''
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bhau Kadam : भाऊ कदम उतरणार निवडणुकीच्या प्रचारात, कुणासाठी मतं मागणार?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement