'आता बघूच कोण जातंय...', प्रणीत मोरेला रंगावरून डिवचलं, अंकिता वालावलकरने बसीर अलीची इज्जतच काढली

Last Updated:

Bigg Boss 19 : बिग बॉस १९ मध्ये बसीर अलीसोबतच्या वादानंतर प्रणित मोरेला महाराष्ट्रातून जोरदार पाठिंबा मिळतो आहे.

News18
News18
मुंबई : सध्या ‘बिग बॉस १९’ चा सीझन रंगात आला आहे आणि या घरात मराठी बाणा घेऊन गेलेला आपला मराठमोळा भाऊ प्रणित मोरे चर्चेचा विषय ठरला आहे. प्रणित आणि बसीर अली यांच्यात झालेल्या तुफान भांडणामुळे आता मराठी प्रेक्षक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी एकी दाखवली आहे. प्रणितच्या समर्थनासाठी कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिता प्रभू वालावलकर हिने एक व्हिडिओ शेअर करून बसीर अलीला सणसणीत उत्तर दिलं आहे.
प्रणित मोरे आणि अमाल मलिक यांच्यात वाद सुरू असताना, बसीर अलीने मध्ये उडी घेतली आणि वाद आणखी वाढला. भांडणाच्या भरात बसीरने प्रणितला रागात “गो बॅक टू युअर व्हिलेज!” असं म्हटलं. बसीरच्या याच वाक्याचा समाचार घेत अंकिता तिच्या व्हिडिओमध्ये म्हणाली, “हा म्हणतोय ‘गो बॅक टू युअर व्हिलेज’, जसा हा मोठ्या शहरातून आला आहे. आलोय आम्ही गावातून... आमच्या गावातले लोक प्रणितला इतके वोट करतील आणि त्या वोट्ससोबत तुला कपडेही पाठवून देतील!” अंकिताने आपल्या मालवणी भाषेतच बसीर अलीला चांगलंच सुनावलं आहे.
advertisement

“आता तर गावी कोण परत जातंय, ते बघायचंय!”

अंकिताने सर्व मराठी प्रेक्षकांना हीच वेळ आहे, असं सांगत आवाहन केलं आहे. ती म्हणाली, “हीच ती वेळ आहे, अख्ख्या महाराष्ट्राने वोट करा. सगळ्या मराठी लोकांनी, गावातल्या गाववाल्यांनी... आता तर आम्हाला बघायचंच आहे की, गावी कोण परत जातंय ते! प्रणितला आता आतच ठेवायचं, तो बाहेर येताच कामा नये.”
advertisement
advertisement
अंकिताने स्वतःचा अनुभव सांगत म्हटलं की, “बिग बॉसच्या घरात काय वाटतं, हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असेल. आपल्या भावाला सपोर्ट करा, भरपूर वोट्स करा.” अंकिताच्या आधी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील स्पर्धक धनंजय पोवार यांनीही प्रणितला पाठिंबा देत बसीरला चांगलंच फटकारलं होतं. नुकतंच बिग बॉस फेम निक्की तांबोळीनेही बसीर अलीची कानउघडणी करत प्रणितला जास्तीत जास्त वोट्स करण्याचं आवाहन केलं आहे. यावरून असं दिसून येतंय की प्रणित मोरेला संपूर्ण महाराष्ट्रातून तुफान पाठिंबा मिळत आहे. आता येणाऱ्या दिवसांमध्ये प्रणितचा गेम कसा असेल हे पाहण्यासाठी सर्वच खूप उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'आता बघूच कोण जातंय...', प्रणीत मोरेला रंगावरून डिवचलं, अंकिता वालावलकरने बसीर अलीची इज्जतच काढली
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement