'फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी लोकांची फसवणूक करतात', ट्रोलर्सना डीपी दादाचं कोल्हापूर स्टाइलनं उत्तर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
dhananjay powar slams troller : डीपी दादा सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याआधी पासून ते हा व्यवसाय सांभाळत आहे. त्यांच्या याच व्यवसायावरून त्यांना ट्रोल करण्यात आलं. पण डीपी दादांच्या ह्युमरपुढे सगळेच फेल आहेत. ट्रोल करणाऱ्याला डीपी दादांनी सडेतोड उत्तर दिलं.
मुंबई : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन गाजवणारा घरातील सगळ्यात मस्तीखोर स्पर्धक म्हणजे धनंजय पोवार. कोल्हापूरचा रांगडा गडी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार उर्फ डीपी दादाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. सोशल मीडियावर डीपी दादा फेमस होतेच पण बिग बॉसमुळे डीपी दादा महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. कॉमेडीचं उत्तर टायमिंग असलेले डीपी दादा सोशल मीडियावर सातत्याने चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतात. पण मिळणारी प्रसिद्ध अनेकांना सहन होत नाही हेही तितकंच खरं.
धनंजय पोवार हे कोल्हापूरातील नामांकीत प्रस्थ आहेत. डीपी दादा आणि त्यांचा वडिलांचा कोल्हापूरमध्ये सोसायटी फर्निचरचा बिझनेस आहे. अनेक वर्षांपासून ते हा बिझनेस करत आहेत. देशभरातून ग्राहक त्यांच्या दुकानात येतात. डीपी दादा सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याआधी पासून ते हा व्यवसाय सांभाळत आहे. त्यांच्या याच व्यवसायावरून त्यांना ट्रोल करण्यात आलं. पण डीपी दादांच्या ह्युमरपुढे सगळेच फेल आहेत. ट्रोल करणाऱ्याला डीपी दादांनी सडेतोड उत्तर दिलं.
advertisement
डीपी दादांनी इन्स्टाग्रामवर ट्रोल करणाऱ्याची कमेंट त्याच्या नावासकट शेअर केली. सचिन जवाळे नावाच्या एका व्यक्ती सोसायटी फर्निचरवरून डीपी दादांना ट्रोल केलं. त्याने कमेंट करत लिहिलंय, सगळे घरदार नाटककार झाले आहे. सर्व सामान्य माणसाची फसवणूक करून आपला व्यवसाय म्हणजे फर्निचरचे दुकान चालवण्यासाठी, लोकांनी यांचे फर्निचर विकत घ्यावे म्हणजे नाटक पाहायला भेटेल.
advertisement

या कमेंटवर डीपी दादांनी त्यांच्या स्टाइलने उत्तर दिलंय. त्यांनी या कमेंटचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत ट्रोल करणाऱ्याला चांगलंच झापलं आहे.
डीपी दादांनी लिहिलंय, किती घाणेरडी वृत्ती असेल लोकांची. काय म्हणून हा माझ्या नावाने बोंबलालाय काय माहिती नाही. ऊट सूट काय पण विषय काढायचा आणि बोंबलायचा. अरे बाबा तुला काय मी फसवलंय का? पैसे घेतलेत का? काय तुझं लग्न होईना म्हणून गावाची माप काढत बसणार आहेस.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 10, 2025 8:36 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी लोकांची फसवणूक करतात', ट्रोलर्सना डीपी दादाचं कोल्हापूर स्टाइलनं उत्तर