निक्की 'बाई' झाली 'आई'; बिग बॉसच्या घरात दोन नव्या पाहुण्यांचं आगमन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
रितेशनं सांगितल्यानुसार, घरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घरात दोन पाहुण्याचं आगमन झालं आहे. कोण आहेत हे दोन पाहुणे?
मुंबई : बिग बॉसच्या घरात दुसऱ्या आठवड्यात रितेशचा भाऊचा धक्का रंगला. रितेशनं अरबाज आणि जान्हवी यांचा चांगलाच समाचार घेतला. एपिसोडच्या शेवटी घरात दोन पाहुणे येणार आहेत असंही रितेशनं सांगितलं. रितेशनं सांगितल्यानुसार, घरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घरात दोन पाहुण्याचं आगमन झालं आहे. दोन पाहणे आल्यामुळे निक्कीचा मात्र रोल बदलला आहे. कोण आहेत बिग बॉसच्या घरातील ते दोन पाहुणे?
बिग बॉसच्या अपकमिंग एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात बिग बॉसनं घरात दोन पाहुण्यांना पाठवलं आहे. हे दोन पाहुणे कोणी अभिनेते नसून खेळण्यातील बाहुले आहेत. यांच्या निमित्तानं घरात पहिल्यांदा पाहुणे आले आहेत. पाहुणे येणार हे कळल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आणि उत्साह पाहायला मिळत होता मात्र दोन बाहुल्यांना पाहिल्यानंतर सगळ्यांमध्ये एकच हशा पिकतो.
advertisement
advertisement
प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, निक्की एका बाहुल्याला हातात घेते आणि जान्हवी एका बाहुल्याला हातात घेते. दोघीही एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्यांना खेळवत असताच. निक्की घन:श्यामच्या बाजुला बसते आणि म्हणते तू मामा आहेस ना याचा. घन:श्यामही उत्तर देत "हो..मी मामा आहे". त्यावर निक्की पुढे म्हणते,"बाळ माझ्यासारखं आहे". त्यानंतर निक्कीला 'बिग बॉस' म्हणतात,"निक्की.. डायरेक्ट बाईSSS वरुन डायरेक्ट आईSSS". बिग बॉसने निक्कीची घेतलेली फिरकी पाहून घरात एकच हशा पिकतो.
advertisement
नव्या पाहुण्यांबरोबरच आज बिग बॉसच्या घरात पॅडी आणि निक्कीचं जोरदार भांडण होणार आहे. निक्कीनं तिची नवी स्ट्रॅटेजी आखली आहे. त्यानंतर निक्की पूर्ण घरंच डोक्यावर घेताना दिसली. तिच्यामुळे घरातल्यांनाही त्रास सहन करावा लागतोय. समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की पॅडीसह घरातील काही सदस्यांवर भडकलेली दिसून येत आहे. निक्की पॅडीला म्हणतेय,“माझ्या वस्तुंना का हात लावला?”. त्यावर पॅडी म्हणतो,“माझी ड्युटी करतोय”. यावर निक्की म्हणते,“मला कामं करायची आहेत…समजलं ना”. रागाच्या भरात निक्की पॅडीचं सगळं सामान घरभर करते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 12, 2024 3:36 PM IST







