Bigg Boss Marathi 6 : रुचिताचा गंभीर आरोप! दिपालीचा पारा चढला, संयमही सुटला; शेवटी एक लगावली
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : दिपाली सय्यद आणि रुचिता जामदार यांच्यात एका विधानावरून सुरू झालेला हा संवाद इतका विकोपाला गेला की बिग बॉसचं संपूर्ण घर हादरलं आहे.
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील वातावरण चांगलंच पेटलेलं दिसतं आहे. आता खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली आहे. शोच्या नव्या एपिसोडच्या प्रोमोत दिपाली सय्यद आणि रुचिता जामदार यांच्यात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. एका विधानावरून सुरू झालेला हा संवाद इतका विकोपाला गेला की संपूर्ण घर हादरलं आहे.
रुचिताने दिपालीवर गंभीर आरोप केला. ज्यामुळे दिपाली शॉक झाली. रुचिताचा आरोप ऐकून तिला धक्काच बसतो. तिच्या रागाचा पारा चढला आणि तिचा संयमही सुटला आहे.
दीपाली आणि रुचिता यांच्यातील संवाद
रुचिता : हिने असं स्टेटमेंट सगळ्यांना सांगितलं की रुचिता तू RB ला touch केलं'.
दीपाली : मी तुझ्यावर बोललेली नाहीये! मी नव्हते ती! मी नव्हते ती! मी नव्हते ती!
advertisement
रुचिता : अंगावर चढू नकोस ...
दीपाली : तू बोट खाली कर ... एक मरेन
रुचिता : हा चल मार!
रुचिता आणि दिपालीतील हा शाब्दिक वाद मारहाणीपर्यंत पोहोचते. प्रोमोच्या शेवटी किंकाळी ऐकू येते. दिपालीने रुचिताला मारलं असं दिसतं.
advertisement
advertisement
या भांडणामुळे घरातील इतर सदस्यही अवाक झाले आहेत. त्यांना नक्की कोणाची बाजू घ्यावी हे कळेनासे झालं आहे. बिग बॉसच्या घरात दररोज नवीन समीकरणं बदलत असताना, दिपाली आणि रुचिता यांच्यातील हा नवा वाद घराचं वातावरण नक्कीच बदलून टाकणार आहे.
Location :
Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 1:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : रुचिताचा गंभीर आरोप! दिपालीचा पारा चढला, संयमही सुटला; शेवटी एक लगावली







