'आपण शब्द दिला की मागे नाही हटत', रितेश भाऊ बार उडवणार; Bigg Boss Marathi 6 नवा कडक प्रोमो

Last Updated:

"दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!" असं म्हणत बिग बॉस मराठी 6 चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. 

News18
News18
बिग बॉस मराठी 6 ची सगळेच आतुरतेनं वाट पाहत आहेत. यंदा देखील रितेश देशमुख सीझन होस्ट करणार आहे. या आधी आलेल्या दमदार प्रोमोनं सगळ्यांची उत्सुकता वाढवली होती. त्यानंतर आता बिग बॉस मराठी 6 चा नवा प्रोमो समोर आला आहे ज्यात रितेश देशमुखचा हटके अवतारा पाहायला मिळतोय. आपण शब्द दिला की मागे हटत नाही म्हणत रितेश सीझन हिट करण्यासाठी सज्ज झाला आहे.
"दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!" असं म्हणत बिग बॉस मराठी 6 चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.  या सीझनच्या थीम विषयी कल्पना देणारा आणि मूड सेट करणारा हा प्रोमो आहे. त्यावरून प्रेक्षकांनी अनेक अंदाज बांधायला सुरुवात केले असून यंदाचा खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून सदस्यांचे नशिब बदलणारा असल्याचं स्पष्ट दिसत आहे. "फॅन्सचा जीव जडला, की ते पाठ नाही सोडत… आणि आपण शब्द दिला की मागे नाही हटत…" अशा कडक शब्दांत रितेश भाऊंनी या सीझनचा बार उडवला आहे. नक्की दारा पलीकडे काय ट्विस्ट असणार? ? सदस्यांना हे सगळं कसं नव्या पेचात टाकणार? कोण होणार पास तर कोण होणार फेल? या सगळ्याची उत्तरं दार उघडल्यावरच मिळणार आहेत.
advertisement
प्रत्येक प्रोमोमध्ये रितेश भाऊ प्रेक्षकांना काहीतरी नवं देतच असतो. कधी सरप्राइझ, नवा लूक, वेगळी स्टाईल, खास स्वॅग हे त्यांच्या प्रोमोचं कायमचं वैशिष्ट्य राहिलं आहे. यंदाही तसंच काहीसं घडले आहे. या प्रोमोमध्ये यंदाच्या सीझनची थीम वेगळ्या पद्धतीतून प्रेक्षकांसमोर आणण्याकरीता भाऊ आपल्या एका हटके लूकमध्ये दिसत आहे. "ह्याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ" प्रोमोमधील भाऊंच्या ओळी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)



advertisement
बिग बॉस मराठीचा 6 वा सीझन 11 जानेवारी पासून सुरू होणार आहे. रात्री 8 वाजता सीझनचा प्रीमियर होणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अनेक कलाकारांनी आणि इन्फ्लुएन्सर्सची नावं बिग बॉस मराठीसाठी चर्चेत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'आपण शब्द दिला की मागे नाही हटत', रितेश भाऊ बार उडवणार; Bigg Boss Marathi 6 नवा कडक प्रोमो
Next Article
advertisement
Bharat Gogawale: भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कारवाईचं कारण काय?”
भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कार
  • भरत गोगावले यांचे पुत्र आणि शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास

  • विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने तब्बल तीन वेळा फेटाळला आहे.

  • आता महाड पोलीस कोणती कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

View All
advertisement