Bigg Boss मराठी फेम अभिजीत सावंतची घरवापसी, पुन्हा दाखवणार जलवा, शेअर केला खास VIDEO

Last Updated:

बिग बॉस मराठीनंतर अभिजीत आता सोनी हिंदी वाहिनीवरील सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमात सहभागी झाला आहे.

बिग बॉस मराठीनंतर अभिजीत आता सोनी हिंदी वाहिनीवरील सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमात सहभागी झाला आहे.
बिग बॉस मराठीनंतर अभिजीत आता सोनी हिंदी वाहिनीवरील सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमात सहभागी झाला आहे.
Indian Idol : गायक अभिजीत सावंत बिग बॉस मराठी ५ मधून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. या कार्यक्रमातील त्याच्या खेळाचे प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं. मात्र, अभिजीतला उपविजेता या स्थानावर समाधान मानावं लागलं. अभिजीतला बिग बॉस मराठी ५ जिंकता आलं नसलं तरीही त्याने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
अभिजीत सावंतला खरी ओळख मिळाली ती इंडियन आयडल या कार्यक्रमामुळे. देशातल्या पहिल्या सिंगिंग रिॲलिटी शोचा तो विजेता ठरला होता. त्याला संपूर्ण देशातून खूप प्रेम मिळाले. यानंतर त्याने अनेक अल्बमसाठी गाणी गायली. मात्र, काळाच्या ओघात हा गायक लुप्त झाला. बिग बॉस मराठीमुळे तो पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आला आणि त्याने पुन्हा एकदा तीच कमाल करून दाखवली.
advertisement
अभिजीतच्या बिग बॉसमधील खेळाचे प्रेक्षकांकडूनच नाही तर कार्यक्रमाचे होस्ट रितेश देशमुखकडूनही खूप कौतुक झाले. घरातील स्पर्धकांकडून त्याच्यावर अनेक आरोप करण्यात आले. मात्र, त्यांच्याकडे लक्ष न देता अभिजीत त्याचा खेळ खेळत राहिला आणि त्याने खेळाच्या उपविजेते पदापर्यंत मजल मारली.
advertisement
बिग बॉस मराठीनंतर अभिजीत आता सोनी हिंदी वाहिनीवरील सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमात सहभागी झाला आहे. या कार्यक्रमात त्याच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, निक्की तांबोळी, तेजस्वी प्रकाश यांच्यासह अनेक हिंदी सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. २७ जानेवारीपासून या कार्यक्रमाचे प्रसारण सुरू झाले आहे. दरम्यान, शोच्या प्रमोशनसाठी स्पर्धकांनी सोनी वाहिनीवरील इंडियन आयडल या लोकप्रिय कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी अभिजीत सावंतही होता.
advertisement
advertisement
अभिजीत सावंत हा इंडियन आयडलचा पहिला विजेता आहे. अशा परिस्थितीत त्याची उपस्थिती खूपच खास होती. त्याने आपले जुने दिवस आठवले आणि त्याच्या सुंदर आठवणींना उजाळा दिला. त्याला पुन्हा एकदा इंडियन आयडलच्या मंचावर गाताना पाहून त्याच्या चाहत्यांना नक्कीच खूप आनंद झाला आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss मराठी फेम अभिजीत सावंतची घरवापसी, पुन्हा दाखवणार जलवा, शेअर केला खास VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement