Bramayugam : मराठी तर दुरच, बॉलिवूडला पण जमणार नाही, ब्लॅक अँड व्हाईट साऊथच्या सिनेमा पाहून तुम्हाला फुटेल घाम!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
आपल्या उत्कृष्ट कथेने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केलेल्या या चित्रपटाचं नाव 'ब्रमयुगम' असं आहे.
मुंबई : सध्या प्रेक्षकांमध्ये हॉरर चित्रपटांबद्दल खूप उत्सुकता दिसत आहे. अशा चित्रपटांकडे प्रेक्षकांचा असलेला कल लक्षात घेऊन विविध भाषांमध्ये हॉरर चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. अलीकडेच अशाच एका हॉरर चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आपल्या उत्कृष्ट कथेने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केलेल्या या चित्रपटाचं नाव 'ब्रमयुगम' असं आहे. 15 फेब्रुवारी 2024 रोजी हा चित्रपट मल्याळम, कन्नड, तेलुगू, तमीळ आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
या चित्रपटामध्ये अष्टपैलू मल्याळम अभिनेते मामुट्टी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. त्यांनी आपल्या दमदार अभिनय कौशल्याने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. विशेष म्हणजे चित्रपट रिलीज होण्याच्या दोन दिवस अगोदर चित्रपटातल्या मुख्य पात्राच्या नावात बदल करण्यात आला होता. अभिनेत्री अमलदा लिझ, अर्जुन अशोकन, सिद्धार्थ, मणिकंदा राजन यांनीदेखील या चित्रपटात काम केलं आहे. प्रेक्षकांना त्यांचाही अभिनय खूप आवडला आहे. राहुल सदासिवन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, चित्रपटाचं एकूण बजेट 27.73 कोटी रुपये होतं.
advertisement
'ब्रमयुगम'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. एक हॉरर थ्रिलर चित्रपट असलेल्या ब्रमयुगमची कथा खूप चांगली आहे. त्यामुळे देशभरातल्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3.1 कोटी रुपयांचं ओपनिंग दिलं होतं. सातव्या दिवशीसुद्धा चित्रपटाने 1.20 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवसापासून चित्रपटाने एकूण 17.81 कोटी रुपयांची कमाई केली आहे. माध्यमांच्या अंदाजानुसार चित्रपटाच्या कलेक्शनची आकडेवारी वाढत जाण्याची शक्यता आहे.
advertisement
या चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा प्रेक्षकांना खूप आवडला होता. ट्रेलर पाहून प्रेक्षकांना अंदाज आला होता की हा चित्रपट खूपच रोमांचक असणार आहे. त्यामुळेच हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकांनी ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं. या चित्रपटाची कथा पॅनन जातीतल्या थेवान नावाच्या गायकाभोवती फिरते. एका ओसाड घरात त्याला आलेले गूढ अनुभव मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले आहेत. चित्रपटाची रंजक कथा अनुभवण्यासाठी तुम्हाला स्वत: तो बघावा लागेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 23, 2024 8:34 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bramayugam : मराठी तर दुरच, बॉलिवूडला पण जमणार नाही, ब्लॅक अँड व्हाईट साऊथच्या सिनेमा पाहून तुम्हाला फुटेल घाम!