Chhaava Vicky Kaushal: शिवजयंतीनिमित्त छावा 'संभा'चा शिवरायांना रायगडावर मुजरा, हात जोडत भावुकपणे म्हणाला...

Last Updated:

Chhaava Vicky Kaushalआज 19 फेब्रुवारी 2025 रोजी, शिवजयंतीच्या निमित्ताने अभिनेता विकी कौशलने रायगड किल्ल्यावर भेट दिली.

विकी कौशल शिवजयंतीनिमित्त रायगडावर
विकी कौशल शिवजयंतीनिमित्त रायगडावर
मुंबई : आज 19 फेब्रुवारी 2025 रोजी, शिवजयंतीच्या निमित्ताने अभिनेता विकी कौशलने रायगड किल्ल्यावर भेट दिली. विकी कौशल सध्या 'छावा' सिनेमामुळे खूप चर्चेत आहे. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारल्यानंतर, विकीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले आणि त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी विकीने त्याला खूप समाधान वाटत असल्याचे सांगितले. याशिवाय त्याने रायगडावर घोषणाही दिल्या.
विकी कौशल पोहोचला रायगडावर
विकी कौशल पहिल्यांदाच रायगडावर आल्यामुळे तो भावूक होता. मीडियाशी बोलताना त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या. त्याने सांगितले, "माझं नशीब, माझं सौभाग्य आहे की, मला किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेता आले. आजचा दिवस माझ्यासाठी सर्व काही आहे, तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आहे."
advertisement
विकी कौशल पुढे म्हणाला, शिवाजी महाराजांचा रोल फक्त छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन साकारण्यामध्येच नव्हता तर संपूर्ण युवांचे जीवन साकारण्यामध्येच आहे. त्यांचे योगदान हे वर्षानुवर्षे आठवणीत राहणारे आहे आणि राहिलेच पाहिजे. ते देशाचे पहिले रयतेचे राजा होते. रयतेसाठी लढले, त्यांच्यासाठीच जगले. त्यांच्यापासून आजपर्यंत आपल्याला प्रेरणा मिळते. आपण म्हणतो लोकांचे आणि लोकांसाठी चालणारे सरकार याची सुरुवातच त्यांच्यापासून झाली.
advertisement
रायगडावर जाऊन विकी कौशलने 'छावा'मधील डायलॉगही बोलले. तो म्हणाला, "शेर नही रहां, लेकिन छावा अभी भी जंगल मैं घूम रहा है, हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते है." विकीने "ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव" अशी गर्जनाही रायगडावर केली.
'छावा' चित्रपटाच्या यशानंतर, विकी कौशलने रायगडावर येऊन शिवरायांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. या भेटीदरम्यान, त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण केले आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना केली. विकीच्या या भेटीमुळे रायगडावर चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. त्याच्या उपस्थितीने शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवजयंतीच्या दिवशी रायगडावर येऊन विकीने आपल्या भूमिकेप्रती असलेली निष्ठा आणि आदर व्यक्त केला आहे.
advertisement
अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना स्टारर 'छावा' ची गर्जना बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून थिएटर हाऊसफुल्ल पाहायला मिळतायेत. जगभरात सिनेमा कमाल करत असून कलेक्शनमध्येही बाजी मारताना दिसत आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Chhaava Vicky Kaushal: शिवजयंतीनिमित्त छावा 'संभा'चा शिवरायांना रायगडावर मुजरा, हात जोडत भावुकपणे म्हणाला...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement