स्टार प्रवाहवर रंगणार कॉमेडीची महासभा, 'चला हवा येऊ द्या' नंतर निलेश साबळे-भाऊ कदम पुन्हा एकत्र येणार!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
महाराष्ट्रातील दोन लाडके विनोदवीर डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम 'चला हवा येऊ द्या' नंतर पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.
मुंबई : गणेशोत्सवानंतर आता सणांचा राजा, म्हणजेच दिवाळी जवळ येत आहे. स्टार प्रवाह वाहिनीने ही दिवाळी आणखी खास बनवण्यासाठी एका खास कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

यावर्षीची ‘ढिंचॅक दिवाळी’ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी घेऊन येत आहे, कारण यात महाराष्ट्रातील दोन लाडके विनोदवीर डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम 'चला हवा येऊ द्या' नंतर पहिल्यांदाच एका वाहिनीवर एकत्र येत आहेत.
advertisement

निलेश साबळे आणि भाऊ कदम यांच्या जुगलबंदीसाठी प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत होते. अखेर, ही प्रतीक्षा आता संपणार आहे.
advertisement

डॉ. निलेश साबळे म्हणाले, “आम्ही खूप दिवसांपासून प्रेक्षकांना हसवण्यासाठी तयारी करत होतो. दिवाळीच्या निमित्ताने आम्ही स्टार प्रवाह वाहिनीवर काहीतरी खास घेऊन येत आहोत. भाऊसोबत काम करताना नेहमीच मजा येते.”
advertisement

ते पुढे म्हणाले, “मी भाऊला आणि भाऊ मला गेली १५ वर्षे ओळखतो. त्यामुळे आमचं टायमिंग खूप चांगलं जुळतं. भाऊ प्रत्येक भूमिकेत जीव ओततो, त्यामुळे तो नेहमीच लेखकाचा आवडता कलाकार राहिला आहे.”
advertisement

भाऊ कदम म्हणाले, “मी पहिल्यांदाच स्टार प्रवाह वाहिनीसोबत काम करत आहे, त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. यंदाची दिवाळी खरंच ‘ढिंचॅक’ असणार आहे, कारण आम्ही प्रेक्षकांना हास्याचा फराळ देणार आहोत.”
advertisement

‘ढिंचॅक दिवाळी’ हा कार्यक्रम कॉमेडी, भावनिक क्षण आणि धमाल डान्सने भरलेला असेल. हा कार्यक्रम १२ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होईल.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 7:59 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
स्टार प्रवाहवर रंगणार कॉमेडीची महासभा, 'चला हवा येऊ द्या' नंतर निलेश साबळे-भाऊ कदम पुन्हा एकत्र येणार!