IND vs PAK : हारिस राऊफचं विमान भरकटलं, अर्शदीपने लॅन्ड केलं, मैदानातला न पाहिलेला Video समोर आला

Last Updated:

IND vs PAK आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये मोठा वाद पाहायला मिळाला. आता अर्शदीप सिंगने हारिस राऊफला दिलेल्या प्रत्युत्तराचा व्हिडिओही समोर आला आहे.

हारिस राऊफचं विमान भरकटलं, अर्शदीपने लॅन्ड केलं, मैदानातला न पाहिलेला Video समोर आला
हारिस राऊफचं विमान भरकटलं, अर्शदीपने लॅन्ड केलं, मैदानातला न पाहिलेला Video समोर आला
मुंबई : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये मोठा वाद पाहायला मिळाला. ग्रुप स्टेजमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही, यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे तक्रारही दाखल केली. तर सुपर-4 मध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंचा मैदानातच राडा झाला.
पाकिस्तानचा बॅटर साहिबजादा फरहान याने अर्धशतक केल्यानंतर एके-47 चालवल्यासारखं सेलिब्रेशन केलं. तर पाकिस्तानचे बॉलर शाहिन आफ्रिदी आणि हारिस राऊफ टीम इंडियाचे ओपनर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलला डिवचत होते. यानंतर अभिषेक आणि गिलने दोघांनाही बॅटने तर प्रत्युत्तर दिलंच, पण हे दोघं हारिस राऊफच्या अंगावरही धावून गेले. अखेर अंपायरला या वादामध्ये मध्यस्थी करावी लागली.
advertisement
हा राडा झाल्यानंतर बाऊंड्री लाईनवर भारतीय चाहत्यांनी हारिस राऊफला डिवचायला सुरूवात केली. तेव्हा त्याने भारतीय प्रेक्षकांना पाहून विमान पाडल्याचे हातवारे केले. तसंच भारतीय चाहत्यांना पाहून त्याने 6-0 असे इशारे केले. हारिस राऊफचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर आता अर्शदीप सिंगने हारिस राऊफवर पलटवार केल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
advertisement
advertisement

मॅचनंतरही अभिषेक-गिलने सुनावलं

दुसरीकडे सामना संपल्यानंतरही अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी पाकिस्तानच्या खेळाडूंना सुनावलं आहे. कारण नसताना पाकिस्तानचे खेळाडू आमच्या अंगावर येत होते, त्यामुळे आम्ही त्यांना बॅटने प्रत्युत्तर दिल्याचं अभिषेक शर्मा प्लेअर ऑफ द मॅच मिळाल्यानंतर म्हणाला. तर शुभमन गिलनेही पाकिस्तानवर पलटवार केला. खेळ बोलतो, शब्द नाही, अशी पोस्ट गिलने या सामन्यानंतर केली आहे.
advertisement

टीम इंडिया फायनलजवळ

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय टीम आशिया कपच्या फायनलजवळ पोहोचली आहे. बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळाला तरी भारतीय टीम फायनलमध्ये जाईल. तर पाकिस्तानला मात्र त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : हारिस राऊफचं विमान भरकटलं, अर्शदीपने लॅन्ड केलं, मैदानातला न पाहिलेला Video समोर आला
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement