Numerology: बुधवार कमाई करून देणारा! या 3 मूलांकाना नशिबाची जबरदस्त साथ; मन हलकं होणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 24 सप्टेंबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कामे होतील पण, बुधवारचा दिवस फारसा अनुकूल नाही. तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मानसिक तणाव जाणवेल. आर्थिक दृष्टीकोनातून दिवस सामान्य आहे. व्यावसायिकांसाठी दिवस फारसा चांगला नाही. त्यामुळे त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. तुमची प्रकृती बिघडू शकते. कुटुंबीयांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा.
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
बुधवार कदाचित तुमच्यासाठी चांगला नाही. आर्थिकदृष्ट्या नेहमीपेक्षा वाईट दिवस असेल. पैशामुळे तणाव वाढू शकतो. कौटुंबिक दृष्टीकोनातून दिवस बरा आहे. कुटुंबातील एखाद्या वृद्ध व्यक्तीची तब्येत अचानक बिघडू शकते. त्यामुळे कुटुंबात तणावाचे वातावरण असेल. तुमच्या मनातले विचार जोडीदाराशी शेअर करा. यामुळे तुमचं मन हलकं होईल.
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
आज बुधवारचा दिवस अनुकूल आहे. ठरवलेली सर्व कामे पूर्ण होतील. बुध्दी आणि विवेक वापरून कामं पूर्ण कराल. तुमच्या कामाचे आणि समजूतदारपणाचे कौतुक होईल. प्रत्येकजण तुमच्या सल्ल्याने काम करेल. आर्थिक बाबींसाठी दिवस चांगला आहे. पैशाची आवक वाढू शकते.
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
बुधवारचा दिवस काहीसा प्रतिकूल आहे. अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनावश्यक धावपळ होईल. आर्थिक दृष्टीकोनातून दिवस अनुकूल नाही. कुठेही पैसे गुंतवू नका. कारण पैसे अडकण्याची शक्यता आहे. आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या इच्छेनुसार पद मिळू शकते. जोडीदाराशी वाद होऊ शकतो.
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
बुधवारचा दिवस ठीक नाही. आर्थिक दृष्टीकोनातून दिवस प्रतिकूल आहे. तुमचा पैसा स्थिर राहणार नाही. कोणालाही उसने पैसै, कर्ज देऊ नका. कारण पैसे परत मिळण्याची शक्यता नाही. तुमची प्रकृती बिघडू शकते. कौटुंबिकदृष्ट्या दिवस सामान्य आहे. कुटुंबातील सदस्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले तर तुम्हाला फायदा होईल. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल.
advertisement
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज बुधवारचा दिवस अनेक कामांसाठी अनुकूल आहे. तुम्ही उत्साही असाल. मनात सकारात्मक विचार असतील. आर्थिक दृष्टीकोनातून दिवस चांगला आहे. पण आवश्यक गोष्टींसाठी जास्त पैसे खर्च कराल. त्यामुळे विचारपूर्वक पैसे खर्च करा. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो.
advertisement
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
बुधवार कामाचा दिवस आहे, आर्थिक दृष्टीकोनातूनसुद्धा दिवस सामान्य असेल. पैसे हुशारीनं गुंतवा. दिवसभर डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. कौटुंबिक जीवन सामान्य असेल. कुटुंबासोबत थोडा वेळ घालवा. त्यामुळे तुम्हाला सुखद अनुभव मिळेल.
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
बुधवारचा दिवस ठीक नसल्यामुळं तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक दृष्टीकोनातून नशीबाची साथ मिळणार नाही. पैसे काळजीपूर्वक गुंतवा. तुम्ही थोडे चिंतेत असाल. ऑफिसमध्ये एखाद्याशी वाद होतील. पण तुम्ही शांत रहा. आज तुमच्या आईची तब्येत अचानक बिघडू शकते. त्यामुळे घरात तणावाचे वातावरण असेल. जोडीदाराशी संबंध बिघडू शकतात. काळजी घ्यावी लागेल.
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
बुधवार बरा असेल, आर्थिक दृष्टीकोनातून दिवस अनुकूल आहे. पैसे मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे देखील परत मिळू शकतात. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक दृष्टीकोनातून दिवस सामान्य आहे. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 8:01 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: बुधवार कमाई करून देणारा! या 3 मूलांकाना नशिबाची जबरदस्त साथ; मन हलकं होणार