पोस्टरमधल्या मराठी अभिनेत्याला ओळखलं का? महात्मा गांधींची भूमिका साकारून मिळवली लोकप्रियता
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Upcoming Movie Dashavatar : दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख भूमिकेत असलेला 'दशावतार' हा कोकणातील निसर्ग, परंपरा आणि गूढ रहस्यावर आधारित सस्पेन्स थ्रिलर चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : महाराष्ट्राची देवभूमी, निसर्गरम्य कोकण आणि तिथल्या लाल मातीत रुजलेली एक भव्य कलाकृती लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय! कोकणच्या मातीतील कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावान कलाकाराचा अवतार लवकरच रूपेरी पडद्यावर साकारला जातोय, आणि हा अवतार म्हणजेच 'दशावतार'!
'चिमणराव', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'चिंची चेटकीण', 'चौकट राजा', 'तात्या विंचू' यांसारख्या अनेक अविस्मरणीय भूमिकांना मालिका, रंगभूमी आणि चित्रपटाच्या पडद्यावर जिवंत करणारे नटश्रेष्ठ दिलीप प्रभावळकर वयाच्या या टप्प्यावर पुन्हा एकदा एका नव्या आणि महत्त्वपूर्ण भूमिकेतून रसिकांसमोर येणार आहेत. 'दशावतार' या कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर आधारित भव्य सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात ते दिसणार आहेत. आजवरच्या त्यांच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूपच वेगळी असून, प्रेक्षकांना ते पुन्हा एकदा आश्चर्यचकित करणार आहेत, अशी खात्री निर्मात्यांनी दिली आहे.
advertisement

'दशावतार': निसर्ग, परंपरा आणि गूढ रहस्याची गाथा!
झी स्टुडिओज् प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित 'दशावतार' हा चित्रपट केवळ कोकणातील अद्भुत निसर्गाचं आणि तिथल्या रूढीपरंपरा, मान्यता व लोककला यांचं मनोरम्य दर्शन घडवणार नाही, तर त्याला गूढ, उत्कंठावर्धक आणि वेगवान थरारकथेची जोडही आहे. कोकणात घडणाऱ्या एका रहस्यमय कथेभोवती या चित्रपटाची बांधणी करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात तो यशस्वी होईल.
advertisement

व्हाईट बिकिनीमध्ये शर्वरी वाघचा बोल्ड अंदाज! फोटोशूटने इंटरनेटवर लावली आग, हॉट लूक पाहून फुटेल घाम!
या चित्रपटाची कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे. चित्रपटाची निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितीन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, विनायक जोशी यांनी केली आहे. चित्रपटाचे कला दिग्दर्शक अजित भुरे असून, कोकणातील गूढ रहस्य प्रेक्षकांसमोर उलगडण्यात येणार आहे.
advertisement

१२ सप्टेंबर रोजी 'दशावतार' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाची पहिली झलक लवकरच झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या एका नव्या भूमिकेसाठी आणि कोकणच्या मातीतील या थरारक गाथेसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 02, 2025 2:07 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
पोस्टरमधल्या मराठी अभिनेत्याला ओळखलं का? महात्मा गांधींची भूमिका साकारून मिळवली लोकप्रियता