आधी शुभांगी अत्रेबद्दल आक्षेपार्ह कमेंट; आता शिल्पा शिंदेचा यू-टर्न, सारवासारव करत पाहा कोणावर फोडलं खापर

Last Updated:

Shilpa Shinde Trolled: शुभांगी अत्रेबद्दल केलेल्या एका विधानामुळे शिल्पा शिंदेला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता या विधानावरून यू-टर्न घेत शिल्पानं मीडियावरच आरोप केले आहेत.

News18
News18
मुंबई: छोट्या पडद्यावरची 'अंगुरी भाभी' म्हटलं की, आजही डोळ्यांसमोर सर्वात आधी नाव येतं ते म्हणजे शिल्पा शिंदेचं. 'सही पकडे है' म्हणत घराघरात पोहोचलेली शिल्पा तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा एकदा तिच्या सर्वांत पॉप्युलर रोलमध्ये परतली आहे. तिच्या पुनरागमनाने चाहते खूश होते, पण हे सेलिब्रेशन फार काळ टिकलं नाही. मालिकेच्या दुसऱ्या 'अंगुरी भाभी' म्हणजेच शुभांगी अत्रेबद्दल केलेल्या एका विधानामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता या विधानावरून यू-टर्न घेत शिल्पानं मीडियावरच आरोप केले आहेत.

नेमकं काय होतं 'ते' वादग्रस्त विधान?

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत शिल्पाला विचारण्यात आलं की, तिच्या अनुपस्थितीत शुभांगीने हे पात्र कसं निभावलं? त्यावर शिल्पा म्हणाली होती, "शुभांगी एक उत्तम अभिनेत्री आहे, पण कॉमेडी करणं ही प्रत्येकाच्या कुवतीची गोष्ट नाही. कोणाची तरी नक्कल करणं खूप कठीण असतं आणि त्यावर प्रचंड दडपण असतं." शिल्पाचं हे बोलणं नेटकऱ्यांना आणि इंडस्ट्रीतल्या इतर काही कलाकारांना अजिबात आवडलं नाही. "तिने शुभांगीचा अपमान केला," अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांसोबतच टीव्ही कलाकारांनीही तिला चांगलंच ट्रोल केलं. मात्र, या प्रकरणावरून आता शिल्पाने मीडियालाच टार्गेट केलं आहे.
advertisement












View this post on Instagram























A post shared by TCX.official (@tellychakkar)



advertisement

शिल्पाने मीडियावरच फोडलं खापर

ट्रोलिंगचा हा वाढता पारा पाहून शिल्पा गप्प बसणारी नव्हतीच. शिल्पाने आता तिच्या स्वतःच्या वक्तव्यावर सारवासारव करत इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मुख्य म्हणजे तिच्यावर होणाऱ्या ट्रोलिंगचं खापर तिने मीडियावर फोडलं आहे. शिल्पाने या सर्व प्रकरणासाठी थेट मीडियाला जबाबदार धरत म्हटलंय, "माझं विधान मीडियाने चुकीच्या पद्धतीनं तोडून-मोडून लोकांसमोर मांडलं आहे. मी शुभांगीबद्दल काहीही नकारात्मक बोलले नाही. मी नेहमीच तिला एक उत्तम अभिनेत्री मानत आले आहे. जे लोक माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं दाखवत आहेत." इतकंच नाही, तर शिल्पाने मीडियावर "भीक मागायची वेळ येईल!" असंही भाष्य केलं.
advertisement
advertisement

शुभांगीचं शांत पण सडेतोड उत्तर

हा वाद जेव्हा शुभांगी अत्रेपर्यंत पोहोचला, तेव्हा तिने अतिशय समजूतदारपणे आणि प्रोफेशनल भाषेत आपली बाजू मांडली. शुभांगी म्हणाली, "मी कोणाचीही नक्कल करत नव्हते. मला दिलेलं 'अंगुरी भाभी'चं पात्र मी प्रामाणिकपणे निभावत होते. जर पात्राची भाषा भोजपुरी असेल, तर मला तीच बोलावी लागेल. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातही कोणाची कॉपी करत नाही." शुभांगीच्या या शांत प्रतिसादाचं सध्या सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.
advertisement

पुन्हा एकदा 'भाभी जी घर पर है'चा कल्ला!

सर्व वाद-विवाद बाजूला ठेवले, तर आता पुन्हा एकदा शिल्पा शिंदेला त्याच जुन्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. १० वर्षांनंतर शिल्पाची ही सेकंड इनिंग मालिकेला टीआरपीच्या शिखरावर नेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
आधी शुभांगी अत्रेबद्दल आक्षेपार्ह कमेंट; आता शिल्पा शिंदेचा यू-टर्न, सारवासारव करत पाहा कोणावर फोडलं खापर
Next Article
advertisement
Thackeray Alliance NCP Sharad Pawar: मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
  • BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट

  • महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युतीवर शिक्कामोर्तब केले असून दुसरीकडे राष्ट्र

  • ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादीतला पेच कुठं अडलाय याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement