42 व्या वर्षी अभिनेत्रीने दिली गुडन्यूज..! दुसऱ्यांदा झाली आई, घरी आला छोटा पाहुणा
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Gauahar Khan: अभिनेत्री गौहर खान पुन्हा एकदा आई झाली आहे. तिच्या घरात छोटा पाहुणा आल्यानं तिच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
मुंबई : अभिनेत्री गौहर खान पुन्हा एकदा आई झाली आहे. तिच्या घरात छोटा पाहुणा आल्यानं तिच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. गौहर आणि तिचा पती जैद दरबार यांना दुसऱ्या अपत्याचं स्वागत केलं आहे. गौहर आणि जैदच्या घरी दुसऱ्यांदा बेबी बॉयचं आगमन झालं आहे. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केलीय.
पहिल्यांदा 2023 मध्ये गौहर आई झाली होती. त्या वेळी तिने जेहान या मुलाला जन्म दिला होता. आता जेहानला छोटा भाऊ मिळाला आहे. गौहरने इंस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. पोस्टमध्ये लिहिलं होतं, “आमच्या जेहानच्या आनंदाला आता सीमा नाही, त्याला भाऊ मिळाला आहे.”
advertisement
गौहर आणि जैद यांनी चाहत्यांचे प्रेम व आशीर्वाद स्वीकारत सर्वांचे आभार मानले. तिच्या पोस्टवर अनेक बॉलिवूड आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. सौंदर्या शर्मा, आयेशा खान, अमायरा दस्तूर, नीती मोहन यांसह अनेकांनी गौहरला शुभेच्छा दिल्या.
advertisement
गौहरने 2020 मध्ये कोरिओग्राफर इस्माईल दरबार यांचा मुलगा झैद दरबारशी लग्न केले होते. अलीकडेच एका मुलाखतीत गौहरने तिच्या दुसऱ्या गरोदरपणाबद्दल सांगितलं होतं की ती या वेळी खूप घाबरली होती. “प्रत्येक गर्भधारणा वेगळी असते. पण आई होणं हा प्रत्येकवेळी एक आशीर्वाद असतो. मला पुन्हा एकदा हे सुख मिळालं, यासाठी मी देवाची आभारी आहे,” असं तिने सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2025 3:36 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
42 व्या वर्षी अभिनेत्रीने दिली गुडन्यूज..! दुसऱ्यांदा झाली आई, घरी आला छोटा पाहुणा