Gautami Patil : अपघातानंतर पीडित रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांना अजूनही का नाही भेटली गौतमी पाटील? अखेर सांगितलं कारण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Gautami Patil on Pune Car Accident : गौतमी पाटीलच्या कार पुण्यात एका रिक्षाला धडक दिली. अपघातानंतर गौतमी पीडिताच्या कुटुंबीयांना भेटायला गेली नाही असा आरोप तिच्यावर करण्यात आला. अखेर तिने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई : डान्सर गौतमी पाटील पुण्यात घडलेल्या रिक्षा अपघातामुळे अडचणीत आली. नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर रिक्षाचालक कुटुंबाने गंभीर आरोप केले होते. पण पोलीस तपासात गौतमी पाटील निर्दोष सिद्ध झाली. त्यानंतर त्यानंतर गौतमीने पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली. दरम्यान अपघातानंतर पीडिताच्या कुटुंबीयांना ती भेटायला का गेली नाही यावरही तिने स्पष्टीकरण दिलं.
गौतमी म्हणाली, "मी दोषी नाही हे पोलिसांनी देखील सांगितलं आहे. कार माझी होती मात्र मी त्यात नव्हते हे मी आधी देखील सांगितल आहे मला बऱ्याच गोष्टींना ट्रोल केले जातेय. कुणी काही म्हटलं तरी मी आता त्याकडे लक्ष देणार नाही, ट्रोल करणाऱ्यांनी मला अजून ट्रोल करावे कारण पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे देखील चेक केले आहेत मी त्या गाडीत नव्हते हे स्पष्ट झाले. तरीही देखील मला दोषी ठरवलं जातंय. त्यामुळे आता मी या गोष्टींकडे लक्ष देणार नाही. मला ट्रोल केलं जातं. नाही त्या गोष्टीचे आरोप माझ्या केले जात आहेत, मला यामागचं कारण मला माहित नाही. ज्या गोष्टीत मी नाही त्यात मला पाडू नका हेच मला सांगायचं आहे"
advertisement
चंद्रकांत पाटील यांनी गौतमीवर केलेल्या वक्तव्यावर देखील तिने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, "दादांना ( चंद्रकांत पाटल ) जे वाटलं ते बोलले तो ज्याचा त्याचा बोलण्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, कोणाला काय बोलायचं आहे. त्यांना वाटलं, त्यांनी तसं उत्तर दिलं. माझं फक्त हेच आहे की ज्यावेळेस हा अपघात झाला त्यावेळेस मी तिथे नव्हते."
advertisement
पीडित कुटुंबाने मदत नाकारली
गौतमीनं सांगितलं, "पीडित कुटुंबाला मदत देण्यासाठी मी माझ्या भाऊ लोकांना पाठवलं होतं. मी मदतीचा हात पुढे केला पण गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांनी करण्यासाठी मदत नाकारली. त्यामुळे जे चाललंय ते कायदेशीर चालू आहे. माझ्यावर आरोप करायला सगळे बसले आहेत. मी पहिल्यापासून ट्रेलर होत आले आहे. जो तो येतो तो बोलून जातो. त्यामुळे मी आता कायदेशीर मार्गाने जाणार आहे.
advertisement
पोलिसांसोबत काय बोलणं झालं?
गौतमी म्हणाली, "पोलिसांना माझं सहकार्य राहिलं आहे. पुढे देखील सहकार्य राहणार आहे. जे कोणी दोषी आहेत त्यांना पूर्णपणे शिक्षा मिळावी. माझा यासाठी पूर्णपणे सपोर्ट आहे. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की चुकीचं काही पसरवू नका."
पीडित कुटुंबाला भेटायला का गेली नाही?
गौतमीने सांगितलं की, "मी ज्यावेळेस माझ्या भावांना तिथे पाठवलं तेव्हा तिथे जे रिप्लाय आम्हाला आले त्यावरून मी असा विचार केला की, मी जिथे जाऊन काही उपयोग नाही. म्हणून मी तिथे गेले नाही. मी मदतीचा हात पुढे केला होता. त्यांच्या कुटुंबाशी माझी सविस्तर चर्चा झालेली नाही. माझे भाऊ त्यांच्याशी बोलले आहेत. माझ्या भावांशी ते संपर्कात आहेत, ते त्यांच्याशी बोलतात."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 12:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gautami Patil : अपघातानंतर पीडित रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांना अजूनही का नाही भेटली गौतमी पाटील? अखेर सांगितलं कारण