advertisement

'या सर्वांना अटक करा', ऐन होळीच्या सणात कोणावर संतापली तेजस्विनी पंडित? VIDEO शेअर करत केली मोठी मागणी

Last Updated:

Holi 2026 Tejaswini Pandit: होळीच्या नावाखाली मुक्या प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराचा हा व्हिडिओ पाहून मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडित चांगलीच संतापली आहे.

News18
News18
मुंबई : आज देशभरात रंगपंचमीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. गुलाल, पिचकारी आणि पुरणपोळीचा बेत आखत प्रत्येकजण रंगांच्या दुनियेत हरवून गेला आहे. सोशल मीडियावर तालावर नाचणाऱ्या कलाकारांपासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वांचेच आनंदी फोटो पाहायला मिळत आहेत. मात्र, याच उत्साहाच्या वातावरणाला गालबोट लावणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, तो पाहून माणुसकीलाही लाज वाटेल. होळीच्या नावाखाली मुक्या प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराचा हा व्हिडिओ पाहून मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडित चांगलीच संतापली आहे.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरतोय, जो पाहून कोणाचंही रक्त सळसळेल. हरियाणातील एका भागात होळीचं सेलिब्रेशन सुरू होतं. तिथे उपस्थित असलेल्या काही नराधमांनी मजामस्तीच्या नावाखाली एका गायीला चक्क दारू पाजली. इतकंच करून हे लोक थांबले नाहीत, तर त्या नशेत असलेल्या गायीला गाडी ओढायला लावून त्यावर अनेक तरुण बसून धिंगाणा घालत होते. ज्या गोमातेला आपण आई मानतो, तिच्यासोबत अशा प्रकारची घृणास्पद वागणूक पाहून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
advertisement
advertisement

"यांना जेलमध्ये टाका!" तेजस्विनी कडाडली

तेजस्विनी पंडित आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. समाजात काही चुकीचं घडलं की तेजस्विनी त्याविरोधात उभी ठाकते. हा व्हिडिओ तिच्या पाहण्यात येताच तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तो शेअर केला आणि प्रशासनाकडे मोठी मागणी केली. तेजस्विनीने कडक शब्दांत म्हटलंय की, "या सर्वांना तातडीने अटक करा!" अशा विकृत लोकांमुळेच सणाचं पावित्र्य धोक्यात येतंय, असं तिचं म्हणणं आहे.
advertisement

सण आनंदाचा, प्राण्यांच्या छळाचा नाही

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्येही प्राण्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली गेली आहे. होळी हा सण एकता, प्रेम आणि सकारात्मकतेचा आहे. पण अशा सणांच्या निमित्ताने मुक्या प्राण्यांना दारू पाजणं किंवा त्यांना शारीरिक इजा पोहोचवणं ही माणुसकी नसून विकृती आहे. हरियाणातील या घटनेने सोशल मीडियावर संतापाची लाट निर्माण केली असून, अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'या सर्वांना अटक करा', ऐन होळीच्या सणात कोणावर संतापली तेजस्विनी पंडित? VIDEO शेअर करत केली मोठी मागणी
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement