'मी तर Workaholic', दीपिका पदुकोणच्या 8 तास शिफ्टच्या वादात माधुरी दीक्षितची उडी, कामाच्या तासांबद्दल स्पष्टच बोलली
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Deepika Padukone's 8-hour shift controversy: बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्रींच्या कामाच्या वेळेवरून मोठी चर्चा सुरू आहे. आता या वादात धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने उडी घेतली आहे.
मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्रींच्या कामाच्या वेळेवरून मोठी चर्चा सुरू आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणने 'स्पिरिट' आणि 'कल्की २८९८ एडी' यांसारख्या चित्रपटांतून ८ तासांच्या शिफ्टसाठी काढता पाय घेतला होता. यानंतर चित्रपटसृष्टीत एक नवा वाद सुरू झाला. आता या वादात धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने उडी घेतली असून, तिने थेट आपल्या कामाच्या सवयीबद्दलचा अनुभव सांगितला आहे.
"मी तर Workaholic आहे!"
माधुरी दीक्षितने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत या विषयावर स्पष्ट मत मांडले. ती म्हणाली, "आम्ही जेव्हा 'मिसेस देशपांडे' चे शूटिंग करत होतो, तेव्हा आम्ही रोज १२ तासांची शिफ्ट काम करत होतो. कधी कधी त्याहून जास्त वेळही लागायचा."
माधुरीने पुढे सांगितले, "मी कामासाठी वेडी आहे. त्यामुळे कदाचित माझ्यासाठी हे वेगळे असेल." एका स्त्रीला कामाचे तास ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे माधुरीने म्हटले आहे.
advertisement
तिने दीपिकाच्या मागणीचे समर्थन केले असले, तरी तिच्या कामाच्या पद्धतीवरून तिने आपले मत मांडले. "एखाद्या स्त्रीमध्ये जर ती शक्ती असेल आणि ती म्हणू शकत असेल की, 'मला इतकेच तास काम करायचे आहे', तर तो तिचा वैयक्तिक अधिकार आहे. ते तिचे आयुष्य आहे आणि तिला जसे करायचे आहे, तसे ती करू शकते. तिला जास्त शक्ती मिळो!" अशा शब्दांत तिने दीपिकाच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
advertisement
दीपिकाच्या ८ तास शिफ्टवर वाद का?
दीपिका पादुकोणने एका मुलाखतीत स्पष्ट केले होते की, अनेक मोठे पुरुष कलाकार अनेक वर्षांपासून ८ तासांची शिफ्ट करत आहेत, पण त्यांच्यावर कोणतीही नकारात्मक टीका झाली नाही. मी स्त्री असल्यामुळेच माझ्या ८ तासांच्या मागणीला 'पुशी' म्हटले जात असेल, तर ठीक आहे." या इंडस्ट्रीत काम करताना अनेक गोष्टी व्यवस्थित नसल्याबद्दलही तिने नाराजी व्यक्त केली होती.
advertisement
माधुरी दीक्षितची आगामी सिरीज 'मिसेस देशपांडे' फ्रेंच थ्रिलर 'La Mante' चा रिमेक आहे. या सिरीजमध्ये एक सिरीयल किलर तिच्या विभक्त झालेल्या मुलासोबत काम करण्याची अट ठेवते. ही सिरीज १९ डिसेंबर रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2025 10:38 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मी तर Workaholic', दीपिका पदुकोणच्या 8 तास शिफ्टच्या वादात माधुरी दीक्षितची उडी, कामाच्या तासांबद्दल स्पष्टच बोलली


