Kajal Aggarwal: काजल अग्रवालचा अपघात? अफवांवर अभिनेत्रीने स्वतः सोडलं मौन, म्हणाली, 'देवाच्या कृपेने..'

Last Updated:

Kajal Aggarwal: साऊथची आघाडीची अभिनेत्री काजल अग्रवाल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण तिचा नवा चित्रपट नव्हे, तर एक धक्कादायक अफवा आहे.

काजल अग्रवालचा अपघात?
काजल अग्रवालचा अपघात?
मुंबई : साऊथची आघाडीची अभिनेत्री काजल अग्रवाल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण तिचा नवा चित्रपट नव्हे, तर एक धक्कादायक अफवा आहे. सोशल मीडियावर अचानक तिच्या अपघाताबद्दल खोट्या बातम्या व्हायरल झाल्या. काहीजणांनी तर इतकंही म्हटलं की ती गंभीर जखमी आहे. यामुळे अभिनेत्रीचे चाहते चिंतेत पडले. मात्र काही तासांतच काजलने स्वतः पुढे येऊन याविषयी सत्य सांगितलं.
अपघाताच्या बातम्यांना वेग येताच काजलने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं, “ही पूर्णपणे निराधार आणि खोटी बातमी आहे. देवाच्या कृपेने मी सुरक्षित, निरोगी आहे आणि माझ्या कामात व्यस्त आहे. कृपया अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.” तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
advertisement
कामाच्या व्यस्त वेळापत्रकात काजल तिच्या पती गौतम किचलूसोबत थोडा रिलॅक्स होण्यासाठी मालदीवला गेली होती. तिथल्या सुंदर फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले. काजलने सांगितलं की मालदीव हे तिच्या फेव्हरेट डेस्टिनेशनपैकी एक असून, तिला तिथे पुन्हा पुन्हा जायला आवडेल.
advertisement
दरम्यान, आता तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण: द इंट्रोडक्शन’मध्ये काजल मंदोदरीची भूमिका साकारत आहे, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भव्य प्रोजेक्टसोबतच ती ‘द इंडिया स्टोरी’, ‘इंडियन 3’ आणि ‘रामायण: पार्ट 2’ सारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Kajal Aggarwal: काजल अग्रवालचा अपघात? अफवांवर अभिनेत्रीने स्वतः सोडलं मौन, म्हणाली, 'देवाच्या कृपेने..'
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement