Ankita Walawalkar Wedding Card: अंकिता वालावलकरची लगीनघाई! कधी करणार लग्न? पत्रिका आली समोर, पाहा PHOTO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
बिग बॉस मराठी 5 सीझनमधील स्पर्धक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आपल्या कामाविषयी आणि लाइफ रिलेटेड अपडेट ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. बिग बॉसमधून बाहेर पडल्यापासून कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकरची लग्नघाई सुरू आहे.
मुंबई : बिग बॉस मराठी 5 सीझनमधील स्पर्धक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आपल्या कामाविषयी आणि लाइफ रिलेटेड अपडेट ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. बिग बॉसमधून बाहेर पडल्यापासून कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकरची लग्नघाई सुरू आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या लग्नाचे अपडेट देत असते. अशातच अंकिताच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. अंकिताच्या लग्नाची खास पत्रिका सध्या तुफान व्हायरल होत आहे.
अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र अखेर आता त्यांची लग्नपत्रिका समोर आली असून लवकरच त्यांची लग्नघाई सुरू होईल. अंकिता-कुणालच्या लग्नाची खास पत्रिका एकदम हटके असून या पत्रिकेचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत.
advertisement
अंकिता आणि कुणालची लग्नपत्रिका केळीच्या पानाच्या थीमची आहे. ही खास पत्रिका अंकिता कुणालच्या चाहत्यांना पसंतीस उतरत आहे. आता लवकरच अंकिताच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे. लग्नाची पत्रिका समोर आली असली तरी लग्नाची तारीख अद्याप रिव्हील केलेली नाही.
दरम्यान, अंकिताचा होणारा नवरा कुणाल हा गायक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक आहे. अनेक मराठी मालिकांसाठी त्याने काम केलं आहे. कुणाल हा देखील कोकणातील माणगाव येथील आहे. अंकिता आणि कुणाल यांनी ''आनंदवारी'' हे गाणं एकत्र केलं होतं. दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळख होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 29, 2024 11:08 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ankita Walawalkar Wedding Card: अंकिता वालावलकरची लगीनघाई! कधी करणार लग्न? पत्रिका आली समोर, पाहा PHOTO