ते मराठी आहेत का? संजय राऊतांना प्रश्न, महेश कोठारेंची पहिली रिअॅक्शन; म्हणाले, 'कोणीही माझ्याविषयी असं...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Mahesh Kothare on Sanjay Raut : दिवाळी कार्यक्रमात दिग्दर्शक, अभिनेते महेश कोठारे यांनी भाजपचं प्रचंड कौतुक केलं. त्यानंतर खासदार संजय राऊतांनी कोठारेंना टोला लगावला. त्यानंतर आता महेश कोठारे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी मागाठाणे येथील दिवाळी निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात 'मी भाजप आणि मोदींचा भक्त आहे' असं म्हटलं. 'मुंबईत भाजपचं कमळ फुलणारचं' असंही ते ठामपणे म्हणाले. महेश कोठारे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत महेश कोठारेंच्या वक्तव्यावर भाष्य केलं.
मुंबईचा महापौर हा भाजपचाच होईल असं महेश कोठारे म्हणाले. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, "ते नक्की मराठी आहेत ना याची शंका आहे. कोणत्याही पक्षाचे असूदेत प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत."
advertisement
राऊतांचा कोठारेंना चिमटा
"महेश कोठारे यांनी असं काही बोलू नये. तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोलत तर. तात्या विंचू मराठी माणूस होता रात्री चावा घेईल आणि गळा दाबेल", असा चिमटाही संजय राऊतांनी काढला.
दरम्यान महेश कोठारे यांच्याशी न्यूज 18 लोकमतने संवाद साधला. तुम्ही तुमच्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहात का? असा प्रश्न विचारला असताना महेश कोठारे म्हणाले, "हो अर्थात, हे माझं स्वत:चं मत आहे. मला माझं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे."
advertisement
राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंचं उत्तर
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत बोलताना महेश कोठारे म्हणाले, "संजय राऊतांचा मी खूप आदर करतो. त्यांच्याविषयी माझ्या मनात खूप आदर आहे. मी माझं जे मत व्यक्त केलं आहे ते माझं स्वत:चं मत आहे. माझं मत व्यक्त करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. ते आपल्या देशामध्ये व्यक्तिस्वातंत्र्य आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. मी जे म्हटलं आहे ती माझ्या मनातील इच्छा आहे ती मी व्यक्त केली, त्यात मी काय चूक केली, मी कोणावर टीका केलेली नाही. मी संजय राऊतांचाही आदर करतो, हे त्यांनी प्लिज नोट करावं."
advertisement
अचानक भाजपचं कौतुक का?
दिवाळीचा कार्यक्रम होता त्याठिकाणी असं काय घडलं ज्यामुळे तुम्हाला भाजपचं कौतुक करावंस वाटलं? असा प्रश्न विचारला असता महेश कोठारे म्हणाले, "माझी एक भावना होती ती मी व्यक्त केली. मला नेहमी असं वाटतं की गेल्या 2014 पासून आतापर्यंत आपण जी प्रगती केली आहे, देशाचा जो विकास झाला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्याचा मला अभिमान आहे. मी कोणत्याही पार्टीचा नाही. मी कोणत्याही राजकारणात सहभागी नाही. मी एक नागरिक म्हणून माझं मत व्यक्त केलं आहे. नागरिक म्हणून माझं मत व्यक्त करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. मी त्यांच्या व्यासपीठावर हे वक्तव्य केलं."
advertisement
संजय राऊतांना उत्तर
'ते नक्की मराठी आहेत ना याची शंका आहे', असं संजय राऊत म्हणाले. त्यावर उत्तर देत महेश कोठारे म्हणाले, "मी मराठी आहे. मी मराठी चित्रपट करतो. मराठी हे माझं प्राधान्य आहे. मला मराठी भाषेचा अभिमान आहे. प्रत्येक मराठी माणसाला आपल्या भाषेचा अभिमान आहे. तेव्हा कोणीही माझ्याविषयी असा संदर्भ करणं चुकीचं आहे. अवश्य मी जे काही करतो ते मनापासून करतो आणि बोलतो ते मनापासून बोलतो."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 1:12 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
ते मराठी आहेत का? संजय राऊतांना प्रश्न, महेश कोठारेंची पहिली रिअॅक्शन; म्हणाले, 'कोणीही माझ्याविषयी असं...'