वयाच्या 53 व्या वर्षी मनीषा कोईरालाने Heeramandi मध्ये दिला तो इंटिमेट सीन; अनुभव सांगत म्हणाली...
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
'हिरामंडी' त अभिनेत्रीनं 53 व्या वर्षी काही इंटिमेट सीन दिले आहेत. हे सीन करण्याचा तिचा अनुभव कसा होता याविषयी नुकतंच अभिनेत्रीनं खुलासा केला आहे.
मुंबई : नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली संजय लीला भन्साळींची ‘हिरामंडी’ ही वेब सिरीज सध्या तुफान चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती हैदरी सारखे कलाकार झळकले आहेत. या वेब सीरिजमधून एकेकाळची सुपरहिट बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाने कमबॅक केलं आहे. तिने यात 'मल्लिकाजान' ही भूमिका साकारली आहे. तिच्या भूमिकेचं खूप कौतुक होत आहे. 'हिरामंडी' त अभिनेत्रीनं 53 व्या वर्षी काही इंटिमेट सीन दिले आहेत. हे सीन करण्याचा तिचा अनुभव कसा होता याविषयी नुकतंच अभिनेत्रीनं खुलासा केला आहे.
मनीषा कोईराला गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीत सक्रिय आहे, पण तिने आजवर संजय लीला भन्साळींसोबत काम केलेलं नाही. त्यांच्यासोबत काम करायचं स्वप्न कधी पूर्ण होईल असं अभिनेत्रीला वाटलं नव्हतं. ‘हिरामंडी’ बद्दल विचारणा करण्यासाठी जेव्हा संजय लीला भन्साळींनी पहिल्यांदा फोन केला तेव्हा अभिनेत्री आपल्या नेपाळच्या घरी बागकाम करत होती. आता नुकतंच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीनं तिच्या भूमिकेविषयी अनेक खुलासे केले आहेत.
advertisement
Hiramandi :12 अफेअर, सम्राटासोबत लग्न; हिरामंडीतील 'या' अभिनेत्रीला मिळालं नाही खरं प्रेम!
मनीषा म्हणाली की, 'मी नेपाळच्या घरी बागकाम करत होते, तेव्हा संजय लीला भन्साळींचा फोन आला. त्यांनी माझ्यासाठी एक चांगली भूमिका असल्याचं सांगितलं. ते म्हणाले फक्त तू एकदा स्क्रिप्ट वाचून घे. त्यानंतर मी प्रचंड आनंदी झाले कारण, त्यांच्याबरोबर काम करण्याचं माझं स्वप्न कधी पूर्ण होईल या आशा मी सोडून दिल्या होत्या आणि त्याचवेळी त्यांनी माझ्याकडे या भूमिकेसाठी विचारणा केली.'
advertisement
याच मुलाखतीत मनीषाला या पात्राविषयी आणि त्यात शेखर सुमन सोबत दिलेल्या इंटिमेट सीनविषयी विचारण्यात आलं. त्यावर बोलताना ती म्हणाली, 'मला या सीनविषयी फारशी कल्पना नव्हती. पण भन्साळी जे काही करतात त्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात. माझ्यासाठी काही गोष्टी नवीन होत्या.' असा खुलासा अभिनेत्रीनं केला आहे.
advertisement
या सीनबाबत शेखर सुमन एका मुलाखतीत म्हणाला होता की, 'हा सीन एका नवाबासंदर्भात होता. जो मद्यधुंद अवस्थेत मल्लिकाजानला भेटण्यासाठी जातो आणि त्यानंतर तिच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण, शेवटच्या क्षणी भन्साळींनी या सीनमध्ये बदल केला. मद्यधुंद अवस्थेत असल्यानं नवाब माघारी फिरून हवेतच हा ओरल सेक्स सीन करेल असं ठरलं.' असा खुलासा शेखरने केला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 08, 2024 10:47 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
वयाच्या 53 व्या वर्षी मनीषा कोईरालाने Heeramandi मध्ये दिला तो इंटिमेट सीन; अनुभव सांगत म्हणाली...










