Vivek Agnihotri: मराठी जेवणाला नावं ठेवली, विवेक अग्निहोत्रीवर संतापली मराठी अभिनेत्री, VIDEO शेअर करत फटकारलं
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Vivek Agnihotri: बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या चित्रपटांसाठी जितके चर्चेत असतात, तितकेच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठीही चर्चेत असतात.
मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या चित्रपटांसाठी जितके चर्चेत असतात, तितकेच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठीही चर्चेत असतात. नुकतंच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मराठी जेवणाला "गरिबांचं जेवण" म्हटल्याने सोशल मीडियावर मोठं वादळ उठलं आहे. प्रेक्षक, चाहत्यांसह मराठी कलाकारांनीही संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री नेहा शितोळे हिने थेट फेसबुक-इंस्टावर लांबलचक पोस्ट करत संतापाची झोड उठवली आहे. पण ही पोस्ट फक्त संतापाची नाही, तर मराठी संस्कृतीची ताकद दाखवणारा ‘आवाज’ आहे.
नेहा म्हणते, “मराठी जेवण म्हणजे गरिबांचं जेवण म्हणणं म्हणजे केवळ जेवणाचा नाही तर मराठी संस्कृतीचा अपमान आहे. वरण-भात, उकडीचे मोदक, पुरणपोळी, थालीपीठ… ही केवळ भूक भागवणारी पदार्थ नाहीत; तर परंपरा, संस्कार आणि आयुष्यभराचं उबदारपण देणारे पदार्थ आहेत. हा माणूस स्वतःला सात्विक खाणारा म्हणतो, पण शेतकऱ्याच्या अन्नाला ‘गरीबांचं’ शिक्का मारतो. म्हणजे शेतकरी गरीब आहे म्हणून त्याचं जेवण हीन आहे का? हा अपमान फक्त जेवणाचा नाही तर त्या शेतकऱ्याचा आहे ज्याच्या घामावर हा देश उभा आहे."
advertisement
advertisement
नेहाचा संताप फक्त इथेच थांबत नाही. ती थेट पल्लवी जोशीवरही टीका करते: “आपली सगळ्यांची लाडकी पल्लवी जोशी, तीच या वक्तव्यावर हसते आहे. तिला हे विनोदी वाटतं. खरंतर एक मराठी मुलगी म्हणून तिनं लगेच आक्षेप घ्यायला हवा होता.” सोशल मीडियावर नेहाची ही पोस्ट धडाक्यात व्हायरल झाली आहे. अनेक मराठी चाहत्यांनी तिच्या बाजूने कमेंट्स करत म्हटलंय, “नेहा, तू जे बोललीस ते मनातलं बोललीस. आता खरंच वेळ आली आहे की मराठी जेवणाला, संस्कृतीला आणि भाषेला कमी लेखणाऱ्यांना जोरात उत्तर द्यावं.”
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 19, 2025 11:36 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Vivek Agnihotri: मराठी जेवणाला नावं ठेवली, विवेक अग्निहोत्रीवर संतापली मराठी अभिनेत्री, VIDEO शेअर करत फटकारलं










