"वादळ तुझं तू राजा...", राज ठाकरेंना अभिनेत्रीचा खुला पाठिंबा, मतदानाच्या एक दिवस आधी शेअर केली सूचक पोस्ट

Last Updated:

Raj Thackeray : मराठी सिनेसृष्टीतील स्पष्टवक्ती अभिनेत्रीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ एक अत्यंत भावनिक आणि जोशपूर्ण पोस्ट शेअर केली आहे.

News18
News18
मुंबई : महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. उद्या, म्हणजेच १५ जानेवारीला मुंबईकर त्यांच्या आवडीच्या उमेदवाराला निवडणार आहेत. राजकारण्यांच्या सभा आणि प्रचाराचा धुरळा शांत झाला असला, तरी सोशल मीडियावर मात्र सेलिब्रिटींच्या पोस्टनी वातावरण चांगलंच तापवलंय. त्यातच आता मराठी सिनेसृष्टीतील स्पष्टवक्ती अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ एक अत्यंत भावनिक आणि जोशपूर्ण पोस्ट शेअर केली आहे.

"वादळ तुझं तू राजा..." तेजस्विनीची खास पोस्ट

या वेळची मुंबई महानगरपालिका निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे, कारण तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले आहेत. मनसे आणि शिवसेना (उबाठा) यांच्या युतीमुळे संपूर्ण मुंबईत एक वेगळीच लाट पाहायला मिळतेय. याच वातावरणाला दाद देत तेजस्विनीने राज ठाकरेंचा एक भारदस्त फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
advertisement
तिने या पोस्टला दिलेलं कॅप्शन सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतंय. तिने लिहिलंय, "मोठी लढाई लढू... मातीसाठी रं गड्या, मनगटाचं जोर लावून.... तू आभाळ आभाळ, वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ दावजी....." या ओळींमधून तिने राज ठाकरेंच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि मराठी मातीसाठीच्या लढाईत त्यांना दिलेला पाठिंबा उघडपणे व्यक्त केला आहे. तेजस्विनी नेहमीच सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपलं मत मांडत असते, पण ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी तिने उघडपणे राज ठाकरे यांना साथ दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement

"भ्रष्ट माणसांच्या हातात पालिका देऊ नका!"

केवळ कोणा एका नेत्याचा प्रचार न करता तेजस्विनीने कालच मतदारांना एक मोलाचा सल्लाही दिला होता. तिने नागरिकांना आवाहन केलं होतं की, आपला नगरसेवक निवडताना सतर्क राहा. तिने म्हटलं होतं की, आपल्या रोजच्या नागरी सुविधांसाठी नगरसेवक महत्त्वाचा असतो, त्यामुळे योग्य आणि सुशिक्षित उमेदवारालाच मत द्या. पण आज थेट राज ठाकरेंचा फोटो शेअर करून तिने आपली दिशा स्पष्ट केल्याचं दिसतंय.
advertisement

मुंबईत चुरशीची लढत, कोण मारणार बाजी?

यंदाची लढाई चौरंगी नसून दोन मोठ्या गटांमध्ये विभागली गेली आहे. एका बाजूला भाजप आणि शिंदे सेना यांची महायुती आहे, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी अभेद्य भिंत उभी राहिली आहे. १५ जानेवारीला मतदान पार पडणार असून अवघ्या २४ तासांनंतर, म्हणजेच १६ जानेवारीला मुंबईचा गड कोण सर करणार, हे स्पष्ट होईल.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
"वादळ तुझं तू राजा...", राज ठाकरेंना अभिनेत्रीचा खुला पाठिंबा, मतदानाच्या एक दिवस आधी शेअर केली सूचक पोस्ट
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement