'तू मर्द असशील तर...', लग्नाआधी आदेश बांदेकरांनी लेकाला दिलेलं चॅलेंज, बाबाचं 'ते' रूप पाहून पुरता घाबलेला सोहम
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Soham Bandekar-Pooja Birari: आता लग्नानंतर एका महिन्याने या गोड जोडीने एका मुलाखतीत आपल्या प्रेमाचे आणि लग्नाचे असे काही गुपित उघड केले आहेत, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
मुंबई: महाराष्ट्राचे लाडके आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या लेकाचं धुमधडाक्यात लग्न झालं. बांदेकरांचा लाडका लेक सोहम बांदेकर आणि लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी २ डिसेंबर २०२५ रोजी विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या आधी अनेक महिन्यांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या, पण दोघांनीही मौन पाळलं होतं. आता लग्नानंतर एका महिन्याने या गोड जोडीने एका मुलाखतीत आपल्या प्रेमाचे आणि लग्नाचे असे काही गुपित उघड केले आहेत, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
आदेश बांदेकरांचं सोहमला चॅलेंज
'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सोहमने अनेक मजेशीर आठवणींना उजाळा दिला. सोहम म्हणाला की, पूजाबद्दल त्याच्या मनात प्रेम तर होतं, पण तो थोडा साशंक होता. तेव्हा त्याचे वडील, म्हणजे आदेश बांदेकर यांनी त्याला चक्क एक चॅलेंज दिलं होता. आदेशजींनी सोहमला म्हटलं, "सोहम, जर तू खरा मर्द असशील तर हिच्याकडून होकार मिळवून दाखव!" सोहमला आधी वाटलं बाबा मस्करी करतायत, पण आदेश बांदेकर गंभीर होते. ते सोहमला म्हणाले, "सोहम, पूजा खूप चांगली मुलगी आहे. तू तुझ्या टेंटेटिव्हमध्ये तिला गमावू नकोस." वडिलांच्या या एका धक्क्याने सोहमला हिंमत दिली आणि त्याने पूजाला प्रपोज केलं.
advertisement
जेवता जेवता ठरलं लग्न
सोहमने सुरुवातीला पूजाला कानातले गिफ्ट केले होते. पूजाने ते कानातले घातले आणि सोहमने तो फोटो लगेच बाबांना (आदेश बांदेकरांना) फॉरवर्ड केला. तो फोटो पाहून बांदेकर कुटुंबियांनी समजून घेतलं की, आता सूनबाई घरी यायला तयार आहेत. मुलाखतीला येताना पूजाने तेच खास कानातले घातले होते, जे सोहमने तिला पहिल्यांदा भेट दिले होते. लग्नाची तारीख कशी ठरली, यावर पूजाने एक मजेशीर खुलासा केला. ती म्हणाली, "आम्ही सगळेजण मिळून जेवायला बसलो होतो. गप्पांचा ओघ जेवणावरून लग्नाकडे वळला आणि चर्चा करता करता चक्क लग्नाची तारीखही फिक्स झाली. आम्हाला कळलंही नाही की आमचं लग्न नक्की कधी ठरलं."
advertisement
advertisement
चाहत्यांची उत्सुकता शिगेला
सोहम आणि पूजाच्या या मुलाखतीचे छोटे छोटे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तथापि, सोहम आणि पूजाच्या मुलाखतीची क्लिप पाहून त्यांच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे. त्यांची पूर्ण मुलाखत पाहण्यासाठी आता प्रेक्षक आतुर झाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 4:57 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तू मर्द असशील तर...', लग्नाआधी आदेश बांदेकरांनी लेकाला दिलेलं चॅलेंज, बाबाचं 'ते' रूप पाहून पुरता घाबलेला सोहम










