Guess Who : फोटोतील ज्येष्ठ मराठी अभिनेत्री, आहे नाना पाटेकर, भारती आचरेकरांच्या गुरू, तुम्ही ओळखलं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
फोटोमध्ये नाना पाटेकर आणि भारती आचरेकर यांच्याबरोबर दिसणारी व्यक्ती मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री आहे. तुम्ही ओळखलं का?
मराठी मनोरंजन विश्वातील अनेक ज्येष्ठ कलाकार सगळ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. अभिनेते नाना पाटेकर, भारती आचरेकर, नीना कुळकर्णी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री भारती आचरेकर हे नुकतेच त्यांच्या गुरूंना भेटले. त्यांच्या गुरू या मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहेत. त्यांच्या गुरूंनी नुकताच त्यांचा 91 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी गुरुंची भेट घेतली.
अभिनेत्री भारती आचरेकर यांनी सोशल मीडियावर त्यांच्या गुरूंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. विजया मेहता असं त्यांचं नाव आहे. विजया मेहता यांनी नुकताच त्यांचा 91 वा वाढदिवस साजरा केला. नाना आणि भारती यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा.
advertisement
भारती आचरेकर यांनी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये भारती आणि नाना यांच्यात झालेला गोड संवाद देखील लिहिला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, "काल 4 नोव्हेंबर, आमच्या गुरु लाडक्या विजया बाईंचा 91 वा वाढदिवस होता. सकाळी सकाळी नानाचा फोन आला, मी बाईंकडे जातोय तू पण ये. माझं शूट दुपारी होत.. गुच्छ घेऊन गेले.. नानाने दादर मार्केट मधून खोली भरेल एवढी असंख्य प्रकारची फूल आणली होती. सबंध घरभर 20 एक फ्लॉवरपॉट मध्ये इतकी सुरेख लावली त्यातच मग्न होता तो. मी म्हटलं नान्या गणपतीची आठवण आली. तर म्हणाला अगं विजयाबाई आपला गणपतीच आहे. खूप कौतुक वाटल त्याचं. बाई पण खूप आनंदात होत्या."
advertisement
advertisement
विजया मेहता हे भारतीय मराठी सिनेसृष्टीतील काही दिग्गज नावांपैकी एक नाव आहे. मराठी सिनेमा आणि रंगभूमीवर विजया मेहता यांनी उल्लेखनीय काम केलं. अभिनेत्री होण्याबरोबरच त्या उत्कृष्ट दिग्दर्शिका आहेत. 'पार्टी', 'रावसाहेब', 'पेस्टनजी' सारख्या सिनेमांत त्यांनी केलेलं दिग्दर्शन उल्लेखनीय आहे. 1960 च्या दशकात त्यांनी प्रयोगशील मराठी रंगभूमीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व होत्या. मराठी सिनेमातील आताच्या अनेक ज्येष्ठ कलाकारांच्या त्या गुरू होत्या. नाना पाटेकर, भारती आचरेकर, नीना कुळकर्णी यांच्यासारखी अनेक कलाकार मंडळी त्यांच्या तालमीत तयार झाल्या. भारती आचरेकर यांच्या या पोस्टच्या निमित्तानं विजया मेहता अनेक वर्षांनी प्रेक्षकांसमोर आल्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 4:26 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Guess Who : फोटोतील ज्येष्ठ मराठी अभिनेत्री, आहे नाना पाटेकर, भारती आचरेकरांच्या गुरू, तुम्ही ओळखलं?


