ढाकाहून पुण्यात आणलं अन् नराधमाने 4 दिवस शरीराचे लचके तोडले; अल्पवयीन बांगलादेशी मुलीची भयंकर अवस्था
- Published by:Prachi Amale
- Reported by:Anis Shaikh
Last Updated:
तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
पुणे : ब्युटी पार्लरमध्ये कामाला लावतो अशी खोटी बतावणी करूनबांगलादेश ढाकावरून देह विक्रीसाठी आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक्सबिरिया सोसायटीमध्ये घडली आहे.
या गुन्ह्याप्रकरणी अल्पवयीन मुलीला बांगलादेश येथून भारतात आणणारे सात ते आठ एजंट तसेच अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा आरोपी जाहीरूल ऊर्फ सुरज जमाल इस्माईल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मागील चार दिवसापासून आरोपीने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याबाबतची माहिती फिर्यादीत दाखल केली आहे. आरोपीच्या तावडीतून मुलीने स्वतःची सुटका करून थेट पोलीस ठाणे गाठत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे.
advertisement
मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता
त्यानुसार पोलिसांनी बालकाचे लैंगिक शोषण अत्याचार प्रतिबंध अधिनियम कायदा (पोक्सो ) अंतर्गत पुन्हा दाखल करून अनैतिक व्यापार मानवी प्रतिबंध शाखा पिंपरी चिंचवड यांच्याकडे गुन्हा वर्ग केला आहे तसेच या घटनेतील इतर फरार सात ते आठ एजंटचा शोध तळेगाव पोलीस घेत आहेत. पोलिसांचे एक पथक यासाठी रवाना करण्यात आलेले आहे. यात आणखी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एका अल्पवयीन मुलीवर एवढ्या अमानुष पद्धतीने तिच्यावर अत्याचार करून तिचा छळ केल्याच्या या घटनेने सर्वांच्याच अंगाचा थरकाप उडाला आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
advertisement
बांग्लादेशातून अनेक मुली महाराष्ट्रात
देहविक्रीसाठी सर्वाधिक महिला बांगलादेशातून आणल्या जातात. बांगलादेशामधून मुलींची मुंबईत तस्करी केल्याचे समोर आले होते. मागील अनेक वर्षांत बांग्लादेशातून अनेक मुली आणल्या होत्या. पोलिसांनी अल्पवयीन मुलीची सुटका केली होती. मात्र या दलालांची साखळी देशभर पसरली आहे. त्यामुळे पोलिसांनी बांगला देशी नागरिकांविरोधात मोहीम सुरू केली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 06, 2025 4:20 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
ढाकाहून पुण्यात आणलं अन् नराधमाने 4 दिवस शरीराचे लचके तोडले; अल्पवयीन बांगलादेशी मुलीची भयंकर अवस्था


