advertisement

'लाडकी बहिण' नंतर 'लाडकी विहिण योजना', कुठे मिळणार लाभ? निर्मिती सावंत यांनी सांगितल्या डिटेल्स

Last Updated:

योजनेचा लाभ अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या लाडक्या प्रेक्षकांनाच मिळणार आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? निर्मिती सावंत यांनी सगळ्या डिटेल्स सांगितल्या.

News18
News18
सध्या राज्यात सर्वत्र 'लाडकी बहीण' योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे. या योजनेमुळे राज्यातील राजकारण देखील चर्चेत आलं आहे. लाडकी बहिण योजना सुरू असताना आता लाडकी विहीण योजना समोर आली आहे. पण या योजनेचा लाभ अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या लाडक्या प्रेक्षकांनाच मिळणार आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? निर्मिती सावंत यांनी सगळ्या डिटेल्स सांगितल्या.
'लाडकी विहीण योजना' या नावाचं नवं मराठी नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनेत्री निर्मिती सावंत प्रमुख भूमिकेत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांनी त्यांचा दमदार विनोदी अवतार रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. ‘कुमारी गंगूबाई मॅट्रिक’ या नाटकाने रंगभूमीवर तुफान लोकप्रियता मिळवली होती. त्या नाटकातील ‘गंगूबाई’मुळे निर्मिती सावंत घराघरात पोहोचल्या. त्यानंतर याच नावाने मालिका देखील खूप गाजली. त्याच नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे आणि निर्माते दिलीप जाधव यांच्यासोबत निर्मिती सावंत पुन्हा एकत्र येत आहेत.
advertisement
‘लाडकी विहीण योजना’ या नाटकाचं लेखन प्रथमेश शिवलकरनं केलं आहे. तर दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केलं आहे.  या नाटकाची निर्मिती अष्टविनायक नाट्यसंस्था आणि पंचशील एंटरटेन्मेंट तर्फे केली जात आहे. निर्मितीमध्ये अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्यासह मंजिरी ओक, संजय मेमाणे आणि स्वप्नील जोशी यांची आहे. प्रसाद ओक निर्माता म्हणून रंगभूमीवर पदार्पण करतोय.
advertisement
advertisement
हे नाटक विहिणींमधील नातेसंबंधांवर आधारित आहे. कोकण परिसराच्या पार्श्वभूमीवर फुलणारी कथा नाटकात पाहायला मिलणार आहे.  कौटुंबिक नात्यांमधील गमती-जमती आणि हलकाफुलका विनोद नाटकात पाहायला मिळणार आहे.
नाटकाबद्दल बोलताना निर्मिती सावंत म्हणाल्या की, त्यांचं नाटकावरचं प्रेम सर्वश्रुत आहे. मात्र चित्रपटांच्या बांधिलकीमुळे सध्या रंगभूमीवर काम करता येत नव्हतं. त्यामुळे नाट्यनिर्मितीची इच्छा मनात होती. दिलीप जाधव यांनी ती इच्छा लक्षात ठेवून हे नाटक त्यांच्यापर्यंत आणलं. प्रमुख भूमिकेत स्वतः आणि मित्र प्रथमेश शिवलकर यांचं लेखन असल्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला. आता 'लाडकी बहीण'नंतर आता 'लाडकी विहीण योजना' रंगभूमीवर किती गाजते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'लाडकी बहिण' नंतर 'लाडकी विहिण योजना', कुठे मिळणार लाभ? निर्मिती सावंत यांनी सांगितल्या डिटेल्स
Next Article
advertisement
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर मुद्दे!
पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर
  • रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुस

  • विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करण्यात आले होते का, असा थेट सवाल

  • रोहित पवार यांनी पायलट सुमित कपूर यांच्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले.

View All
advertisement