अखेर इस्राइलहुन मायदेशी सुखरूप परतली नुसरत भरुचा; प्रतिक्रिया देत म्हणाली 'मी सध्या खूप अस्वस्थ...'
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
अभिनेत्री नुसरत भरुचा इस्त्राईल मध्ये अडकली होती. तसंच तिचा संपर्कही तुटला होता. तेव्हापासून तिचे चाहते नुसरत सुखरूप मायदेशी परतण्यासाठी प्रार्थना करत होते. आता नुसरत अखेर मायदेशी सुखरूप परतली आहे. तिची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
मुंबई, 08 ऑक्टोबर : इस्राइल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री इस्राइलमध्ये अडकलेली होती. बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिच्याबाबत सातत्याने अपडेट्स येत आहेत. शनिवारपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्री इस्त्राईल मध्ये अडकली होती. तसंच तिचा संपर्कही तुटला होता. तेव्हापासून तिचे चाहते नुसरत सुखरूप मायदेशी परतण्यासाठी प्रार्थना करत होते. आता नुसरत अखेर मायदेशी सुखरूप परतली आहे. तिची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
‘हायफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होण्यासाठी नुसरत इस्राइलमध्ये गेली होती. 28 सप्टेंबरपासून सुरू झालेला हा चित्रपट महोत्सव 7 ऑक्टोबरला संपला. पण त्यातच युद्धाची सुरुवात झाली. नुकतंच नुसरत इस्राइलमध्ये अडकल्याची माहिती होती. काही काळापूर्वीच नुसरत भरुचाशी दूतावासाचा संपर्क झाला असून तिला इस्रायलहून भारतात पाठवलं जाईल अशी माहिती समोर आली होती. आता अखेर नुसरत मुंबई विमानतळावर उतरली आहे.
advertisement
'अखेर वहिनी सापडली...' सलमान खानसोबत 'ती' मुलगी नक्की कोण? फोटो पाहताच चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नुसरत खूपच परेशान आणि अस्वस्थ दिसत आहे. यावेळी तिने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. जास्त काही न बोलता नुसरतने फक्त 'मी सध्या खूप अस्वस्थ आहे, मला घरी पोहोचू द्या' अशी प्रतिक्रिया दिली आहे. नुसरतला इस्राइलमधून थेट भारतात फ्लाइट मिळाली नाही. त्यामुळे नुसरत दुबईमार्गे भारतात पोहोचली आहे.
advertisement
अभिनेत्री 'हायफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सहभागी होण्यासाठी तिथे गेली होती. या चित्रपट महोत्सवात नुसरत भरुचाचा 'अकेली' हा चित्रपट दाखवण्यात आला. पण त्याच दरम्यान तिथे युद्ध झाले आणि नुसरत तिथेच अडकली.
advertisement
अभिनेत्रीच्या टीमने ही माहिती दिली. वास्तविक, नुसरतची टीम कालपासून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्याचा अभिनेत्रीशी संपर्क तुटला होता. अशा स्थितीत सगळेच घाबरले होरे. अभिनेत्रीच्या टीमचे म्हणणे आहे की, नुसरतशी काल दुपारी 12.30 वाजता शेवटचा संपर्क झाला होता. त्यावेळी ती तळघरात होती आणि पूर्णपणे सुरक्षित होती.
7 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता पॅलेस्टिनी संघटना हमासने अवघ्या 20 मिनिटांत इस्रायलवर 5 हजार रॉकेट डागले होते. हे रॉकेट निवासी इमारतींवर पडले आणि 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. गाझाच्या विविध भागात शनिवारपासून बॉम्बस्फोट सुरू आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांतील शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशाच परिस्थितीत नुसरत तिथे अडकल्याने चाहते खूपच चिंतेत होते. मात्र आता तिला सुखरूप मायदेशी परतलेलं पाहून चाहत्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 08, 2023 4:06 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
अखेर इस्राइलहुन मायदेशी सुखरूप परतली नुसरत भरुचा; प्रतिक्रिया देत म्हणाली 'मी सध्या खूप अस्वस्थ...'









