'डोकं टेकव तरच...' बिष्णोई समाजाकडून सलमान खानला ऑफर, 25 वर्षांची दुश्मनी संपणार?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
सलमानच्या जीवाला धोका आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानची सेक्युरिटी आणखी वाढवण्यात आली आहे. अशातच आता बिष्णोई समाजाकडून सलमान खानला ऑफर देण्यात आली आहे.
मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला गेली 25 वर्षांपासून धमक्या मिळत आहेत. 1998 साली “हम साथ साथ है” च्या शूटिंगवेळी सलमान खानसह काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी काळविटाची शिकार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण अजूनही कोर्टात आहे, पण या घटनेमुळे बिष्णोई समाज सलमान खानविरोधात आहे. तेव्हापासून सलमानच्या जीवाला धोका आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानची सेक्युरिटी आणखी वाढवण्यात आली आहे. अशातच आता बिष्णोई समाजाकडून सलमान खानला ऑफर देण्यात आली आहे.
सलमानला खानला आता डोकं टेकव तरच माफ केलं जाईल अशी ऑफर बिष्णोई समाजाकडून देण्यात आली आहे. यासाठी त्यांनी कुठे, कोणत्या मंदिरात डोकं टेकवायचं याविषयीदेखील सांगितलं आहे.
बिष्णोई समाजाने सलमान माफ करण्यासाठी दिली ऑफर
सलमानला माफ केलं जाईल मात्र त्याला बिष्णोई समाजाच्या काही अटी मान्य कराव्या लागतील, असं बिष्णोई समाजाकडून सांगण्यात येत आहे. सलमान खानला मुकाम धाम येथील गुरु जंभेश्वर महाराजांच्या समाधी स्थळ मंदिरात येऊन 26 वर्ष जुना वाद संपवण्याची ऑफर बिश्नोई समाजाकडून देण्यात आली आहे.
advertisement
दरम्यान, सलमान खान लॉरेन्स बिष्णोई गँगच्या टार्गेटवर आहे. बाबा सिद्धिकीच्या हत्येनंतर तर सलमानच्या सुरक्षेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्धिकीच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता सलमान खान आणि खान कुटुंबावर संकटांचं सावट आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2024 3:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'डोकं टेकव तरच...' बिष्णोई समाजाकडून सलमान खानला ऑफर, 25 वर्षांची दुश्मनी संपणार?