“मी महिलांच्या बाबतीत...”; अक्षय खन्ना सर्वात जवळच्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल, Dhurandhar नंतर जुने किस्से बाहेर

Last Updated:

Akshaye Khanna Father: ‘धुरंधर’मधील दमदार भूमिकेमुळे चर्चेत असलेल्या अक्षय खन्नामुळे वडील विनोद खन्नांचा एक जुना, बेधडक इंटरव्ह्यू पुन्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील वैयक्तिक आयुष्यावरील विधानांमुळे खन्ना कुटुंब पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

News18
News18
मुंबई : धुरंधरचित्रपटातील दमदार अभिनयामुळे अभिनेता अक्षय खन्ना सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटातील त्याचा अभिनय आणि FA9LA या गाण्यातील डान्स स्टेप्स पाहून अनेक चाहत्यांना दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांची आठवण झाली आहे. यानंतर अक्षय खन्ना आणि विनोद खन्ना यांच्याशी संबंधित जुने व्हिडीओ आणि मुलाखती पुन्हा व्हायरल होत आहेत.
advertisement
दरम्यान विनोद खन्ना यांचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये विनोद खन्ना स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसतात. या मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, “मी महिलांच्या बाबतीत संत नाही.”
विनोद खन्ना म्हणाले होते, “मी अविवाहित होतो आणि मला देखील इतर पुरुषांप्रमाणेच शारीरिक गरजा आहेत. महिलांशिवाय आपण अस्तित्वातच नसतो आणि लैंगिक संबंधांशिवाय मानवी जीवन शक्य नाही. मग मी महिलांसोबत राहतो, यावर कुणाला आक्षेप का असावा?” असे त्यांनी त्या मुलाखतीत सांगितले होते.
advertisement
advertisement
विनोद खन्ना आणि अक्षय खन्ना वेगवेगळे
विनोद खन्ना यांनी आयुष्यात दोन विवाह केले. त्यांनी 1971 मध्ये गीतांजली खन्ना यांच्याशी लग्न केले होते. मात्र 1985 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. याच काळात विनोद खन्ना यांनी चित्रपट करिअरमधून ब्रेक घेत ओशो यांच्या आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी कविता खन्ना यांच्याशी दुसरे लग्न केले.
advertisement
दुसरीकडे अक्षय खन्नाने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. एका जुन्या मुलाखतीत त्याने स्पष्ट केले होते की, दबावाखाली लग्न करणे मला मान्य नाही. लग्न करण्यापूर्वी योग्य व्यक्ती सापडणे गरजेचे आहे. फक्त कुटुंबाचा दबाव आहे म्हणून लग्न करणे चुकीचे आहे. मात्र त्याने हेही सांगितले होते की, “कदाचित कधीतरी ते घडेल”.
advertisement
नंतरच्या एका मुलाखतीत अक्षय खन्नाने स्वतःला “लग्नासाठी योग्य व्यक्ती नाही” असे म्हटले होते. त म्हणाला की, लग्न म्हणजे मोठी जबाबदारी आणि जीवनशैलीतील मोठा बदल असतो.” 2016 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने हेही सांगितले होते की, मला एकटे राहायला आवडते. मी स्वतःमध्ये समाधानी आहे आणि त्यामुळेच नात्यांबाबत मी अधिक सावध झालो आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
“मी महिलांच्या बाबतीत...”; अक्षय खन्ना सर्वात जवळच्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल, Dhurandhar नंतर जुने किस्से बाहेर
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement