Phula Trailer : लहान वयात खंडोबाशी लग्न अन्... 'फुला'चा ट्रेलर रिलीज, या दिवशी येणार थिएटरमध्ये
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मराठी सिनेमा फुला चा संगीतमय ट्रेलर रिलीज झाला आहे. एप्रिल महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे.
एप्रिल महिन्यात अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातील एक सिनेमा म्हणजे फुला. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा होती. या सिनेमाचा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. त्यानंतर आता सिनेमाचा संगीतमय ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरवरून सिनेमाची स्टोरी काय असेल याचा अंदाज आला आहे. वाघ्या-मुरळीची पारंपरिक संस्कृती, संगीतमय गोष्ट, एका स्त्रीचा संघर्ष "फुला" या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
2 मिनिटं 58 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतंय, लहान वयातच खंडोबाशी लग्न लावलेली एक मुलगी, तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, संस्कृतीच्या पदराखाली नाकारलं जाणारं तिचं अस्तित्व. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट आहे.
advertisement
प्रियांतिका, आरोही गडदे, मंजुषा खेत्री, संतोष शिंदे, देवा गाडेकर, रविकिरण जावीर, सनी कदम, छाया आदट, शरद लांडगे या नव्या दमाच्या कलाकारांचा उत्तम अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
देखण्या दृश्यप्रतिमा, नवे पण कसदार कलाकार, अस्सल संगीताचा बाज या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. एकीकडे एआयसारख्या तंत्रज्ञानाचा विस्तार होत असताना अजूनही परंपरांचा किती खोल पगडा समाजावर आहे याचा विरोधाभास हा चित्रपट अधोरेखित करतो.
advertisement
आटपाडीतील काही तरुणांनी एकत्र येऊन केलेल्या या वेगळ्य़ा धाटणीच्या चित्रपटात सात गाणी, टीजरला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे आता अधिकच उत्सुकता निर्माण केली आहे. आटपाडी तालुक्यातील निंबवडे सारख्या ग्रामीण भागात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. संगीतमय पद्धतीनं मांडलेला संघर्ष या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. फुला हा सिनेमा 17 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. .
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 1:48 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Phula Trailer : लहान वयात खंडोबाशी लग्न अन्... 'फुला'चा ट्रेलर रिलीज, या दिवशी येणार थिएटरमध्ये








