Prajakta Mali - Lalit Prabhakar : पुन्हा जुळून आल्या 'रेशीमगाठी', प्राजक्ता-ललितची रोमँटिक मिठी; व्हिडीओ तुफान व्हायरल

Last Updated:

Prajakta Mali - Lalit Prabhakar : ललित आणि प्राजक्ता अनेक वर्षांनी महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर एकत्र आले. दोघांना तब्बल 10 वर्षांनी एकत्र पाहून चाहत्यांनी प्रचंड आनंद व्यक्त केलाय.

News18
News18
मुंबई : मराठी टेलिव्हिजनवरील काही हिट आणि कल्ट मालिकांचा विचार केला तर त्यात एक नाव डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे जुळून येती रेशीमगाठी. झी मराठीवरील या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आदित्य आणि मेघना या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही ही मालिका युट्यूबवर आवर्जून आणि आवडीनं पाहिली जाते. आदित्य आणि मेघनाची जोडी प्रेक्षकांची डोक्यावर घेतली. ही जोडी पुन्हा एकत्र यावी अशी प्रेक्षकांची इच्छा होती. अखेर प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण झाली. आदित्य आणि मेघना अनेक वर्षांनी एकत्र दिसले. दोघांनी एकमेकांबरोबर रोमँटीक डान्सही केला.
अभिनेता ललित प्रभाकर याने मालिकेत आदित्यची भूमिका साकारली होती तर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं मेघनाची भूमिका साकारली होती. दोघांना या मालिकेनं प्रसिद्ध, नाव आणि फेम मिळवून दिलं. त्यामुळे त्यांच्यासाठीही ही मालिका खूप खास होती. ललित आणि प्राजक्ता अनेक वर्षांनी महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर एकत्र आले. दोघांनी एकमेकांबरोबर डान्स केला. दोघांचा रोमँटीक डान्स पाहायला मिळाला.
advertisement
अभिनेता ललित प्रभाकरचा प्रेमाची गोष्ट 2 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ललित अनेक ठिकाण दिसतोय. प्रमोशनसाठी तो महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर पोहोचला. प्राजक्ता हास्यजत्रेची होस्ट आहे. ललितचं आपल्या शोमध्ये स्वागत करताना प्राजक्ता प्रचंड आनंदी होती.
advertisement
advertisement
महाराष्ट्राची हास्यजत्राच्या आगामी एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे ज्यात पाहायला मिळतंय की, प्राजक्ता शो होस्ट करतेय. तेवढ्यात ललित तिला म्हणतो, प्राजक्ता, प्रेमाच्या गोष्टीचा विषय चालू होता ना, तर तुझी आठवण आली. त्यावर लाजून प्राजक्ता म्हणते, अगं बाई.. ललित तिला म्हणतो, गाण्यातील दोन ओळी मला तुझ्याबरोबर परफॉर्म करायला आवडतील.
advertisement
त्यानंतर ललित आणि प्राजक्ता प्रेमाची गोष्ट 2मधील ओल्या सांज वेळी या गाण्यावर रोमँटीक डान्स करतात. गाण्याची हुक स्टेप करता करता दोघे एकमेकांना मिठी मरतात. दोघांचा हा रोमँटीक अंदाज पाहून चाहत्यांना जुळून येती रेशीमगाठीमधल्या आदित्य आणि मेघनाची आठवण झाली. चाहत्यांनी प्रचंड आनंद व्यक्त केलाय.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Prajakta Mali - Lalit Prabhakar : पुन्हा जुळून आल्या 'रेशीमगाठी', प्राजक्ता-ललितची रोमँटिक मिठी; व्हिडीओ तुफान व्हायरल
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement