advertisement

बस कंडक्टर ते साऊथ सुपरस्टार; रजनीकांत यांचं खरं नाव माहितीये? 'या' कारणामुळे बदलावं लागलं

Last Updated:

रजनीकांत यांचं खरं नाव रजनीकांत नाहीये हे फार कमी लोकांना माहिती आहे. रजनीकांत यांनी फार लहान वयात काम करायला सुरूवात केली. 


rajinikanth
rajinikanth
मुंबई, 12 डिसेंबर : साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना ओळखत नाही असं भारतात कोणी सापडणार नाही. केवळ देशात नाही तर विदेशातही रजनीकांत यांचं नाव गाजतं. चाहते त्यांना प्रेमानं थलाइवा असं म्हणतात. साऊथमध्ये थलाइवाचा अर्थ देव असा आहे. पण फार कमी लोकांना माहिती असेल की साऊथच्या या देवाचं खरं नाव हे रजनीकांत नाहीच. रजनीकांत यांचं खरं नाव काय? त्यांनी त्यांचं नाव का बदललं? सगळं जाणून घेऊया.
रजनीकांत यांना 1975 साली वयाच्या 25व्या वर्षी Apoorva Ranagangal या तमिळ सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. सिनेमात त्यांचा केवळ 15 मिनिटांचा रोल होता. त्यानंतर भुवन ओरू केल्विकुरी या सिनेमानं रजनिकांत यांचं आयुष्य बदललं. पुढे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. चाहते त्यांना देव मानू लागले.
advertisement
रजनीकांत यांचं खरं नाव रजनीकांत नाहीये हे फार कमी लोकांना माहिती आहे. रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजाराव गायकवाड असं आहे. एका मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. फार कमी वयात त्यांची आई जाजीबाई यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या वडिलांचं नाव रामोजी राव. ते एक पोलीस कॉन्स्टेबल होते. रजनीकांत यांना 3 भाई-बहिण आहे. त्यात ते चौथे आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती तशी बेताची होती. म्हणून रजनीकांत यांनी फार लहान वयात काम करायला सुरूवात केली. अभिनय क्षेत्रात येण्यआधी ते बस कंडक्टर म्हणून काम करायचे.
advertisement
View this post on Instagram

A post shared by Rajinikanth (@rajinikanth)

advertisement
रजनीकांत यांचं नाव बालचंदर दिग्दर्शित अपूर्व रागांगल (1975) या तमिळ सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी बदलण्यात आलं. सिनेनिर्माते के बालचंदर यांनी शिवाजीराव गायकवाड यांना रजनीकांत हे नाव दिलं. बालचंदर यांनी अभिनेते शिवाजी गणेशन यांच्या नावाशी कोणाचा गोंधळ होऊ नये म्हणून रजनीकांत यांना त्यांच्या मंचाचं नाव दिले.
अभिनेते रजनीकांत हे अस्सल मराठी देखील बोलतात. सध्या ते चेन्नई येथे राहतात. वयाच्या 73व्या वर्षी देखील ते सिनेमात काम करत आहेत. नुकताच त्यांचा जेलर हा सिनेमा देखील रिलीज झाला. लवकरच त्यांचे काही नवे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. रजनीकांत सध्याचे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत. त्यानी जेलर सिनेमासाठी 210 कोटी मानधन घेतल्याचं म्हटलं जातंय.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
बस कंडक्टर ते साऊथ सुपरस्टार; रजनीकांत यांचं खरं नाव माहितीये? 'या' कारणामुळे बदलावं लागलं
Next Article
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement