advertisement

Rajashri Deshpande : एकीकडे कॅन्सरची ट्रीटमेंट, दुसरीकडे राजश्री देशपांडेचा नवा मराठी सिनेमा; या दिवशी होणार रिलीज

Last Updated:

Rajshri Deshpande New Marathi Movie : एकीकडे कॅन्सरवर ट्रिटमेंट घेणाऱ्या राजश्रीच्या बाबतीत एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राजश्री देशपांडे नव्या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

News18
News18
अभिनेत्री राजश्री देशपांडे तिच्या एका पोस्टने सगळ्यांनाच वाईट वाटलं. कारण ही पोस्ट साधी नव्हती तर तिच्या आजारपणाची माहिती देणारी होती. मराठी तसंच हिंदी आणि आता ओटीटी विश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री राजश्री देशपांडे कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करत आहे. राजश्रीला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. एकीकडे कॅन्सरवर ट्रिटमेंट घेणाऱ्या राजश्रीच्या बाबतीत एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राजश्री देशपांडे नव्या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
राजश्री देशपांडे बाप्या या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमानं आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवला आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. "आपली यारी… गावावर भारी!" अशी हटके टॅगलाईन असलेल्या या सिनेमाचं हटके पोस्टर देखील समोर आलं आहे.
advertisement
पोस्टरमध्ये पोस्टरमध्ये पाठमोरी उभी असलेली व्यक्ती आणि तिला पाहून गावातील इतर पात्रांच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्य, कुतूहल आणि प्रश्नार्थक भाव अनेक प्रश्न निर्माण करतात. विशेष म्हणजे पोस्टरमधील ती पाठमोरी व्यक्ती म्हणजे अभिनेत्री राजश्री देशपांडे आहे.  पण ती अशी का उभी आहे? तिच्या आगमनाने गावात एवढे आश्चर्य का निर्माण होते? आणि तिच्या येण्याने नेमके काय बदल घडणार आहेत? हे सिनेमा पाहिल्यानंतरच कळणार आहे.
advertisement
'बाप्या' या सिनेमात राजश्री देशपांडेसह अभिनेते गिरीश, देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पोस्टरमुळेच चित्रपटाची कथा नेमकी काय असेल, या बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. रिलीजआधी या सिनेमाला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (PIFF) मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे तीन मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. या तिहेरी सन्मानामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
advertisement
राजश्री देशपांडेची ही रहस्यमय व्यक्तिरेखा नेमकी कशी आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. बाप्या हा सिनेमा येत्या 15 मे रोजी रिलीज होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rajashri Deshpande : एकीकडे कॅन्सरची ट्रीटमेंट, दुसरीकडे राजश्री देशपांडेचा नवा मराठी सिनेमा; या दिवशी होणार रिलीज
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement