Danny Pandit Wedding: फेमस रीलस्टार डॅनी पंडित अडकला लग्नबंधनात, रीअल लाइफ अर्धांगिनीची पहिली झलक केली शेअर!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Danny Pandit Wedding: इंस्टाग्रामवरील फेमस रील स्टार डॅनी पंडित लग्नबंधनात अडकला आहे. डॅनीने अचानक लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
मुंबई : इंस्टाग्रामवरील फेमस रील स्टार डॅनी पंडित लग्नबंधनात अडकला आहे. डॅनीने अचानक लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. डॅनीने लग्नाचा पहिला फोटो आणि रिअल लाइफ अर्धांगिनीची पहिली झलक शेअर केली आहे.
पुणेरी मुलगा, अतरंगी रॅपर हटके स्वॅगसाठी ओळखला जाणारा डॅनी पंडित म्हणजेच मुकेश पंडितने लग्न केलं आहे. त्याने गुपचूप लग्न उरकून सर्वांना मोठं सरप्राइज दिलं. लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत त्याने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
advertisement
डॅनीने नेहा कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधली आहे. नेहा एक VFX आर्टिस्ट आहे. दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.
दरम्यान, डॅनी हा एक वकिल आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे रील बनवायला खूप आवडतात. त्याचे वडिलांचं पानाचं दुकान होतं. त्याने खूप मेहनतीनं त्याची ओळख बनवली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2024 8:25 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Danny Pandit Wedding: फेमस रीलस्टार डॅनी पंडित अडकला लग्नबंधनात, रीअल लाइफ अर्धांगिनीची पहिली झलक केली शेअर!