सागर कारंडे बिग बॉस मराठीच्या घरात मळत होता तंबाखू? डीपी दादांनी थेट VIDEOच दाखवला
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बॉस मराठीच्या घरातून एक व्हिडीओ समोरआला आहे. जो डीपी दादाने शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
बिग बॉस मराठी 6 चा खेळ चांगलाच रंगात आला आहे. घरात 17 स्पर्धक गेलेत आणि सगळेच चांगलाच धुडगूस घालत आहेत. बिग बॉसच्या घरात गेलेल्या प्रत्येक स्पर्धकाची एक वेगळी बाजू नेहमीच प्रेक्षकांसमोर येते. प्रत्येकाच्या सवयी, चांगल्या वाईट गुण बिग बॉसच्या घरात दिसतात. दोन आठवड्यात घरातील अनेक स्पर्धकांच्या बाबतीत हे पाहायला मिळालं. दरम्यान एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अभिनेता सागर कारंडे बिग बॉसच्या घरात तंबाखू मळतोय असं दिसतंय. बिग बॉस मराठी 5 चे स्पर्धक डीपी दादा म्हणजे धनंजय पोवार यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे जो चांगलाच व्हायरल झालाय.
डीपी दादांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात सागर कारंडे बिग बॉसच्या घरात बाथरुम एरियामध्ये आहे. व्हिडीओमध्ये तो सुरुवातीला पाठमोरा उभा आहे. त्याच्या हातात काही तरी असल्याचं दिसतंय. व्हिडीओमध्ये पुढे सागर कारंडे आरशासमोर उभा आहे. त्याच्या हातात काही तरी असल्याचं पुन्हा आरशात दिसतंय. त्यानंतर कोणीतरी येतं आणि सागर कांरडे वळतो. हातात जे आहे ते लपवण्यासाठी तो मूठ बंद करतो. त्यानंतर हात मागे घेतो.
advertisement
डीपी दादांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. डीपी दादा व्हिडीओमध्ये म्हणतायत, मी एक व्हिडीओ दाखवतो फक्त बघा. मला फक्त डाऊट आहे. सागर दादा इथे काय करत आहेत ते कळत नाहीये. तंबाखू खाणारा माणूस जे करतो ते सगळं ते इथे करताना दिसताय.
advertisement
advertisement
डीपी दादा व्हिडीओच्या शेवटी म्हणाले, वैष्णव म्हणून एक मुलगा आहे. त्याच्या आयडीवरचा व्हिडीओ मला सहज कोणीतरी शेअर केला आणि मी बघितलं. म्हटलं त्यातलं क्रॉप करून घ्यावं. मस्त शोधून काढलाय. फक्त मला डाऊट आहे. खरं खोटं तुमचं तुम्ही शोधून काढा. माझा काय संबंध नाही त्याच्यात. तुमचं तुम्ही बघा. जब्बा. सागर भाऊ मळ तू डबल. व्हिडीओमध्ये डीपी दादांनीही हसू आवरेनासं झालंय.
advertisement
डीपी दादांनी शेअर केलेला हा व्हिडीओ खरा की खोटा हे अद्याप समोर आलेलं नाही. न्यूज 18मराठीही याची पुष्टी करत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 9:46 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
सागर कारंडे बिग बॉस मराठीच्या घरात मळत होता तंबाखू? डीपी दादांनी थेट VIDEOच दाखवला







