advertisement

व्हॅलेंटाईन वीकची फुल्ल तयारी! 'तेरे नाम'सह 3 चित्रपट थिएटरमध्ये रि-रिलीज होणार; तारखा काय असणार?

Last Updated:

प्रेक्षकांच्या आग्रहास्तव व्हेलेंटाईन वीकच्या दरम्यान सलमान खान आणि भूमिका चावला ह्यांचा 'तेरे नाम' चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे.

News18
News18
गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये जुने चित्रपट रिलीज करण्याचा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडमध्ये प्रेक्षकांकडून चित्रपटांना भरघोस प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय. गेल्या वर्षी 'सनम तेरी कसम' सिनेमा व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर रि- रिलीज झाला होता. चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. पहिल्यांदा रिलीज झालेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप  ठरला होता, पण जेव्हा रि-रिलीज झाला तेव्हा जबरदस्त कमाई केली होती. आता यावर्षी सुद्धा प्रेक्षकांना व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर आणखी एका नव्या चित्रपटाचे गिफ्ट मिळणार आहे.
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आता सलमान खान आणि भूमिका चावला ह्यांचा 'तेरे नाम' चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. सलमान खान फिल्मी करियरमधला सर्वाधिक गाजलेला आणि हिट चित्रपटांच्या यादीतील एक चित्रपट म्हणता येईल. तब्बल 23 वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. व्हेलेंटाईन वीकच्या निमित्ताने हा कल्ट क्लासिक सिनेमा थिएटरमध्ये रि-रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सलमानचे फॅन्स 'तेरे नाम' चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'तेरे नाम' चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
advertisement
2003 साली रिलीज झालेला हा 'तेरे नाम' चित्रपट सलमान खानच्या करिअरमधील गाजलेल्या सिनेमांपैकी एक आहे. या चित्रपटामुळे सलमान खऱ्या अर्थानं बॉलिवूडमध्ये सुपरस्टार झाला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अभिनेत्याने या चित्रपटामध्ये राधे भैय्याची भूमिका साकारली होती, तर भूमिका चावलाने नीरजा भारद्वाज तरूणीचे पात्र साकारले आहे. राधे भैय्या आणि नीरजाची अपूर्ण लव्हस्टोरी आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे त्या काळातही आणि आजही लाखो फॅन्स आहेत. 12 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ह्या चित्रपटाने 25 कोटींपेक्षा अधिकची कमाई करत चित्रपटाने विक्रम रचला होता. रि- रिलीज झाल्यानंतर चित्रपट किती कमाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यामध्ये एकूण तीन चित्रपट वेगवेगळ्या तारखांना रिलीज होणार आहे. माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय बच्चन आणि शाहरूख खानचा 'देवदास' येत्या 6 फेब्रुवारी 2026 रोजी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. अजय देवगण आणि अभिषेक बच्चन यांचा 'युवा' चित्रपट 20 फेब्रुवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे. तर सलमान खान आणि भूमिका चावलाचा 'तेरे नाम' चित्रपट 27 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
व्हॅलेंटाईन वीकची फुल्ल तयारी! 'तेरे नाम'सह 3 चित्रपट थिएटरमध्ये रि-रिलीज होणार; तारखा काय असणार?
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement