Salman Khan Birthday : 2000 कोटींचा मालक असलेल्या सलमानचा पहिला पगार माहितीये? हॉटेलमध्ये केलं होतं काम

Last Updated:

27 डिसेंबर 1965 रोजी जन्मलेल्या सलमानने कोट्यवधी चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. सध्याच्या घडीला तो बॉलिवूडमधला सर्वांत महागडा आणि डिमांडिंग स्टार बनला आहे.

सलमान खानचा पहिला पगार किती?
सलमान खानचा पहिला पगार किती?
मुंबई, 27 डिसेंबर :  बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाइफमुळे सतत चर्चेत असतो. दबंग शैली आणि किलर स्वॅगमुळे विविध वयोगटांत त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. चाहत्यांचा लाडका सलमान खान 27 डिसेंबर 2023 रोजी 58वा वाढदिवस साजरा करत आहे. इंडस्ट्रीतल्या सर्वांत महागड्या कलाकारांमध्ये सलमानचा समावेश होतो; पण त्याची पहिली कमाई 100 रुपयांपेक्षाही कमी होती हे फार कमी जणांना माहिती असेल.
सलमानने आपला अभिनय आणि प्रयत्नांच्या जोरावर अनेक चित्रपट मिळवले. त्याने आपल्या कारकिर्दीत मैंने प्यार किया, साजन, हम आपके हैं कौन, करण-अर्जुन, जुडवा, प्यार किया तो डरना क्या, तेरे नाम, दबंग, बॉडीगार्ड, एक था टायगर, बजरंगी भाईजान असे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ अनेक सुपरहिट चित्रपट देऊन सलमानने यशाचं शिखर गाठलं आहे.
advertisement
27 डिसेंबर 1965 रोजी जन्मलेल्या सलमानने कोट्यवधी चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. सध्याच्या घडीला तो बॉलिवूडमधला सर्वांत महागडा आणि डिमांडिंग स्टार बनला आहे. तो कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. अभिनेता असण्यासोबतच तो एक बिझनेसमनदेखील आहे. त्याचं 'सलमान खान फिल्म्स (SKF)' नावाचं प्रॉडक्शन हाउस आहे. बीइंग ह्युमन नावाचा एक ब्रँडदेखील त्याने लाँच केला आहे. या सर्व गोष्टींमधून त्याची भरपूर कमाई होते. याशिवाय ब्रँड एंडॉर्समेंटमधूनही तो कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.
advertisement
सलमानने इंडस्ट्रीत अनेक ट्रेंड सेट केले आहेत. तो त्याच्या पिळदार शरीरयष्टीसाठी ओळखला जातो. त्याने बॉलिवूडमध्ये सिक्स पॅक अॅब्ज आणि शर्टलेस बॉडी फ्लाँट करण्याचा ट्रेंड सुरू केला. त्यातून त्याचे चाहते आणि अनेक बॉलिवूड कलाकारांनी प्रेरणा घेतली. सलमान खानने अनके नवोदितांना इंडस्ट्रीत संधी दिली आहे. त्यामुळे इंडस्ट्रीतले अनेक जण त्याला 'भाईजान' अशी हाक मारतात.
advertisement
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सलमानने स्वत: एका मुलाखतीमध्ये आपल्या पहिल्या कमाईबाबत माहिती दिली होती. त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं, की त्याची पहिली कमाई 75 रुपये होती. मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये एका कार्यक्रमात त्याने बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं होतं. या कामासाठी त्याला 75 रुपये मोबदला मिळाला होता. 'मैंने प्यार किया' या हिट चित्रपटासाठी त्याला फक्त 31 हजार रुपये मानधन मिळालं होतं. सलमान खानची एकूण संपत्ती ही सध्याच्या घडीला 2000 कोटी असल्याचं म्हटलं जातंय.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Salman Khan Birthday : 2000 कोटींचा मालक असलेल्या सलमानचा पहिला पगार माहितीये? हॉटेलमध्ये केलं होतं काम
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement