कोरोना काळात लग्न, 5 वर्षात संसार मोडला; राहुल देशपांडेनंतर 'देवबाभळी' फेम अभिनेत्रीचा डिवोर्स
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Actress Divorce : गायक, अभिनेता राहुल देशपांडेनं लग्नाच्या 17 वर्षांनी डिवोर्स घेतला. त्यानंतर आता संगीत देवबाभळी फेम अभिनेत्रीच्या डिवोर्सची माहिती समोर आली आहे.
मुंबई : प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि अभिनेता राहुल देशपांडे पत्नीपासून विभक्त झाला. 17 वर्षांच्या संसारानंतर राहुल आणि नेहा यांनी डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतला. राहुल देशपांडेच्या डिवोर्सच्या बातमीनंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. राहुल देशपांडेच्या डिवोर्सची बातमी ताजी असताना आता 'संगीत देवबाभळी' नाटकातील प्रसिद्ध अभिनेत्रीनं देखील डिवोर्स घेतल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीच्या नवऱ्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. अभिनेत्रीच्या डिवोर्सची माहिती समोर येताच चाहत्यांना धक्का बसला आहे.
'संगीत देवबाभळी' हे नाटक सध्या सर्वत्र लोकप्रिय झालं आहे. नाटकाचे प्रयोग हाऊसफुल सुरू आहेत. नाटकात आवलीची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिनं डिवोर्स घेतला आहे. अभिनेत्रीच्या नवऱ्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. दोघांनी सामंजस्यानं हा निर्णय घेतल्याचं त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
advertisement
आनंद ओक असं शुभांगीच्या नवऱ्याचं नाव आहे. तो देखील संगीतकार आहे. आनंद ओक यानं सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिलंय, "प्रिय मित्रांनो, मी आणि शुभांगीने काही वर्षांपूर्वीच परस्पर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हे स्वीकारण्यास आम्हालाही थोडा वेळ लागला. पण आता हा निर्णय जाहीर करण्याची योग्य वेळ आली आहे. आम्ही एकत्र जे क्षण घालवले आहेत त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. शुभांगीला तिच्या भविष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. ती उत्तम अभिनेत्री आहे आणि खूप चांगली व्यक्ती आहे. भविष्यात आम्हाला जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही नक्कीच एकत्र काम करू जसं यापूर्वीही एकत्र काम केलं आहे."
advertisement

शुभांगी आणि तिचा नवरा आनंद सध्या संगीत देवबाभळी या नाटकात एकत्र काम करत आहे. आनंद ओक हा संगीत देवबाभळीचा संगीतकार आहे. 2020मध्ये दोघांनी लग्न केलं होतं. अखेर लग्नाच्या 5 वर्षांनी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळात त्यांनी लग्न केलं होतं. लग्नानंतर कोरोना काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता. हातात काम नसल्याने दोघांनी नाशिकमध्ये फुड स्टॉल सुरू केला होता. दोघांनी एकमेकांना खंबीर साथ दिली होती. पण अखेर लग्नाच्या काही वर्षांनी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 04, 2025 8:14 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
कोरोना काळात लग्न, 5 वर्षात संसार मोडला; राहुल देशपांडेनंतर 'देवबाभळी' फेम अभिनेत्रीचा डिवोर्स