Dunki Day 1 Box Office Collection : पठाण, जवानच्या तुलनेत शेवटच्या रांगेत फेकला गेला 'डंकी'; पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

Last Updated:

शाहरूखच्या डंकीला प्रभासचा सालार टक्कर देणार. सालारा हा बहुप्रतिक्षित सिनेमा आज म्हणजेच 22 डिसेंबरला रिलीज झाला आहे.

डंकी बॉक्स ऑफिस कलेक्शन
डंकी बॉक्स ऑफिस कलेक्शन
मुंबई, 22 डिसेंबर : 223 वर्षातील शाहरूख खानचा डंकी हा तिसरा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमानं पहिल्याच दिवशी देशभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शाहरूखचा सिनेमा म्हटल्यावर सिनेमाला गर्दी होणार पक्क आहे. राज कुमारी दिग्दर्शि डंकी या सिनेमाला पहिल्या दिवशी भरगोस प्रतिसाद मिळाला. सकाळी 5.55 चा पहिला शो देखील हाऊसफुल्ल असल्याचं दिसलं. मुंबईतील आयकॉनिक सिंगल स्क्रिन थिएटर गेयटी गॅलेक्सी सारख्या थिएटरमधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. शाहरूखच्या चाहत्यांनी पहिल्या दिवशी दणकून सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळतंय. असं सगळं असलं तरी डंकीनं पहिल्या दिवशी किती कमाई केली माहितीये? पाहूयात.
शाहरूख खानच्या डंकी कडून प्रेक्षकांना खूप जास्त अपेक्षा होत्या. कारण पठाण आणि जवान सिनेमानं केलेल्या कमाईचा आकडा लक्षात घेता डंकी हा सिनेमा किती कमावणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. पठाण आणि जवानच्या तुलनेत डंकी हा सिनेमा वेगळ्या थाटणीचा असल्याचं पाहायला मिळालं आहे. शाहरूखचा एक वेगळा अंदाज या सिनेमा पाहायला मिळतोय.
advertisement
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, शाहरूखच्या डंकी सिनेमानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 30 कोटींची कमाई केली आहे. डंकी हा शाहरूखचा या वर्षातील सर्वात लो बजेट सिनेमा आहे. सिनेमाची ओपनिंग देखील या वर्षातील सर्वात कमी ओपनिंग होती. डंकीची अँडवान्स बुकींग पाहायला गेल्यास एकूण 15कोटींचं अँडवान्स बुकींग करण्यात आलं होतं. अँडवान्स बुकींच्या दुप्पट कमाई सिनेमानं पहिल्या दिवशी केली.
advertisement
शाहरूखच्या डंकीला प्रभासचा सालार टक्कर देणार. सालारा हा बहुप्रतिक्षित सिनेमा आज म्हणजेच 22 डिसेंबरला रिलीज झाला आहे. डंकीच्या तुलनेत साराला सर्वोधिक अँडवान्स बुकींग झालं आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटी प्रभासचा सालार भाव खाऊन जाणार असं दिसत आहे. डंकी सिनेमात शाहरूख खानबरोबर अभिनेत्री तापसी पन्नू, विक्की कौशल, बोमन ईरानी, सतीश शाह आणि विक्रम कोचर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
advertisement
शाहरूखच्या जवाननं पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई केली होती. तर पठाण सिनेमानं 57 कोटी कमावले. एनिमल या सिनेमानं 63.8 कोटी तर टायगर 3 नं पहिल्या दिवशी 43 कोटींची कमाई केली होती. या सगळ्यात शाहरूखच्या डंकीनं 30 कोटींची सर्वात कमी ओपनिंग केली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dunki Day 1 Box Office Collection : पठाण, जवानच्या तुलनेत शेवटच्या रांगेत फेकला गेला 'डंकी'; पहिल्या दिवशी केली इतकी कमाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement