Dunki- Salaar Advance Booking : शाहरूखवर भारी पडणार प्रभास? अँडवान्स बुकींगचा लक्षवेधी आकडा

Last Updated:

शाहरूख खान 'जवान' आणि 'पठाण'नंतर आता डंकीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर 'आदिपुरूष'च्या फ्लॉप नंतर प्रभासच्या सालारची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

 शाहरूखवर भारी पडणार प्रभास?
शाहरूखवर भारी पडणार प्रभास?
मुंबई, 20 डिसेंबर : अभिनेता सलमान खानचा 2023 वर्षातील तिसरा सिनेमा रिलीज होतोय. 'डंकी' या सिनेमाची प्रेक्षकही आतुरतेनं वाट पाहत आहेत. 'पठाण' आणि 'जवान'नंतर शाहरूखचा डंकी बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष असताना आता साऊथ अभिनेता प्रभासच्या 'सालार' सिनेमाची देखील चर्चा सुरू आहे. शाहरूखच्या सिलसिल्यात प्रभासचा सालार एक नवी उमेद घेऊन येत आहे. दोन्ही सिनेमे एकावेळी रिलीज होत असल्यानं दोन्ही सिनेमांची एक्साइटमेंट खूप वाढली आहे. दोन्ही सिनेमांचं अँडवान्स बुकींग देखील सुरू आहे.
शाहरूख खान 'जवान' आणि 'पठाण'नंतर आता डंकीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर 'आदिपुरूष'च्या फ्लॉप नंतर प्रभासच्या 'सालार'ची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. दोन्ही सिनेमाचं अँडवान्स बुकींग पाहायला गेलं तर सालारच्या अँडवान्स बुकींगनं डंकीला मागे टाकलं आहे.
advertisement
दोन्ही सिनेमांचं अँडवान्स बुकींग हैराण करणार आहे. प्रभासचा 'सालार' प्री तिकिट बुकींगमध्ये सलमान खानला तगडी फाइट देतोय. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'डंकी'च्या फर्स्ट डेसाठी आतापर्यंत 3 लाख 67 हजार तिकिटं विकली गेली आहेत. 'डंकी'च्या अँडवान्स बुकींगची आतापर्यंतच विक्री ही 10.47 कोटी रूपये झाली आहे.
तर प्रभासचा 'सालार: पार्ट 1 सीजफायर' हा सिनेमा एकूण 6 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमाची आतापर्यंत 6 लाख 78 हजार तिकिटं विकली गेली आहेत. सिनेमाच्या अँडवान्स बुकींची आतापर्यंतची विक्री 14.88 कोटी रूपये आहे. 'सालार' आणि 'डंकी' यांच्यात तगडी टक्कर पाहायला मिळतेय. शाहरूख खानवर प्रभास भारी पडणार असं दिसतंय. असं झाल्यास आदिपुरूषमुळे प्रभासच्या नावावर बसलेला फ्लॉपचा ठप्पा दूर होण्यास मदत होईल.
advertisement
'सालार' सिनेमा 22 डिसेंबरला रिलीज होतोय. सिनेमा दमदार अँक्सन सीननं भरलेला आहे. तर शाहरूखचा 'डंकी' एक दिवस आधी म्हणजेच 21 डिसेंबरला रिलीज होतोय. सिनेमात शाहरूख खानसह तापसी पन्नू, विक्की कौशल, बोमन ईरानी, विक्रम कोचर, अनिल ग्रोवर आणि ज्योती सुभाष अशी तगडी स्टारकास्ट आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dunki- Salaar Advance Booking : शाहरूखवर भारी पडणार प्रभास? अँडवान्स बुकींगचा लक्षवेधी आकडा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement