आईसाठी काय पण! भाईजाननं दिली फोटोग्राफर्सना ताकिद, 'या' कारणामुळे चांगलाच भडकला सलमान, Video

Last Updated:

19 डिसेंबरला अभिनेता सोहेल खानचा 53वा बर्थडे होता. सोहेलला शुभेच्छा देण्यासाठी सलमान खान संपूर्ण फॅमिलीबरोबर पोहोचला होता.

हेल खानच्या बर्थडे पार्टीत पापाराझींवर भडकला सलमान
हेल खानच्या बर्थडे पार्टीत पापाराझींवर भडकला सलमान
मुंबई, 20 डिसेंबर : अभिनेता सलमान खान सध्या त्याला येणाऱ्या धमक्यांमुळे चर्चेत आहे. सलमान कुठेही जातो तिथे त्याच्यावर सुरक्षा रक्षक तैनात असते. पण किती सुरक्षा असली तरी सलमानचे चाहते मात्र कमी होत नाही. नुकताच सलमान खान त्याचा छोटा भाऊ सोहेल खानच्या बर्थडे पार्टीमध्ये गेला होता. सोहेलचा 53वा वाढदिवस साजरा करून पुन्हा घरी परतत असताना मात्र सलमान खाननं त्याच्या रौद्र अवतार दाखवला. सलमान खान पापाराझींवर भयंकर चिडला. त्याचा हा अँगर कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
19 डिसेंबरला अभिनेता सोहेल खानचा 53वा बर्थडे होता. सोहेलला शुभेच्छा देण्यासाठी सलमान खान संपूर्ण फॅमिलीबरोबर पोहोचला होता. यावेळी सलमानबोरबर वडील सलीम खान, हेलेन, सलमा खान, आर्पिता खान आणि आयुष शर्मा, अलवीरा खान होते.
advertisement
बर्थडे पार्टी संपल्यानंतर भाईजान आपल्या फॅमिलीसह वेन्यूमधून बाहेर आला.सलमान दिसताच पापाराझींनी फोटोशूट सुरू केलं. सलमानची एक झलक कॅमेरात कैद करण्यासाठी पापाराझींची गर्दी वाढली. सलमान, भाईजान म्हणत त्यांनी एकच गदारोळ सुरू केला. पापाराझींच्या गर्दीमुळे सलमानला गाडीत बसता आलं नाही. हे सगळं पाहून सलमान खान चांगलाच भडकला आणि त्याने मागे वळून डोळे मोठे करून बोट दाखवून पीछे हटो सब, म्हणाला.
advertisement
सलमानचा एक आवाज ऐकून सगळेच शांत झाले. गर्दी कमी करून सलमान घरी गेला. पापाराझींवर भडकलेल्या सलमान खानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमानचा राह पाहून नेटकऱ्यांनी पापाराझींनी कलाकारांना इतका त्रास देऊ नये असं म्हटलं आहे.
advertisement
सलमान खानच्या भोवती सध्या कडक सिक्युरिटी असते. गँगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या कथित धमकीनंतर सलमान खानच्या सिक्युरिटीमध्ये वाढ करण्यात आली आहे
सलमान खानचा नुकताच टायगर 3 हा सिनेमा रिलीज झाला. पठाणच्या तुलनेत सिनेमानं कमी केली. सिनेमात सलमान खानबरोबर अभिनेत्री कतरिना कैफ आणि इमरान हाशमी प्रमुख भूमिकेत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
आईसाठी काय पण! भाईजाननं दिली फोटोग्राफर्सना ताकिद, 'या' कारणामुळे चांगलाच भडकला सलमान, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement