2023 चे 'खलनायक': या 7 अॅक्टर्सने यावर्षी मारली बाजी! संजय दत्तपासून बॉबी देओलपर्यंत; 1 तर खरंच गेला तुरुंगात
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Year End 2023, Top Villains: 2023 हे वर्ष संपत आलंय आणि मनोरंजन विश्वाचे रिपोर्ट कार्ड तयार होतेय. या वर्षात अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. त्याचबरोबर शाहरुख खानपासून ते सनी देओलपर्यंत सर्वांनीच आपल्या कामाने इम्प्रेस केले. याशिवाय यावर्षी चित्रपटांमध्ये खलनायकांची नवीन बॅचही पाहायला मिळाली. नायक-खलनायक बनलेल्या या कलाकाराने आपल्या स्टाइलमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याचबरोबर काही चेहरे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. चला, या वर्षी खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सात खास चेहऱ्यांबद्दल बोलूया.
advertisement
खलनायकांच्या या यादीत पहिले नाव संजय दत्तचे आहे, ज्याने बॉलिवूड कलाकारांना प्रेरणा दिली. त्यामुळे नायकाची भूमिका साकारणारे कलाकार खलनायक म्हणून त्यांच्या वेगवेगळ्या छटा दाखवू लागले. बॉलिवूडसोबतच संजय दत्तने साऊथमध्येही आपला ठसा उमटवला. या वर्षी तो थलापति विजयच्या 'लिओ' चित्रपटात 'अँटोनी दास'च्या भूमिकेत दिसला होता. त्याला खूप पसंती मिळाली . याआधी तो 'केजीएफ'मध्ये 'अधीरा'च्या भूमिकेत दिसलाय.
advertisement
संजय नंतर या वर्षात जर कोणत्या नवीन व्हेलेनने सर्वांना प्रभावित केले असेल तर तो म्हणजे मनीष वाधवा. मनीष या वर्षी दोन मोठ्या चित्रपटात दिसला आणि दोन्ही चित्रपटात त्याची भूमिका आवडली. मनीषने शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटात आणि सनी देओलच्या 'पठाण' चित्रपटात पाकिस्तानी मेजर जनरलची भूमिका साकारली आणि खूप टाळ्या मिळवल्या.
advertisement
हिरोनंतर व्हिलेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सैफ अली खानच्या नावाचाही समावेश होतो. यावर्षी तो ओम राऊतचा मेगाफ्लॉप चित्रपट 'आदिपुरुष'मध्ये निगेटिव्ह शेडमध्ये दिसला. प्रभासची ही फिल्म डिजास्टर ठरली पण सैफ अशा पात्रांमध्ये फिट दिसतो. याआधीही त्याने बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्याय. आता तो ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटात 'भैरा'च्या भूमिकेत दिसेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर थलायवर अर्थात रजनीकांतच्या 'जेलर'चा उल्लेख नक्कीच येईल. विनायकनं या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांना भुरळ घातली. पण खऱ्या आयुष्यातही तो यापूर्वी खलनायकाच्या भूमिकेत दिसलाय. दारूच्या नशेत त्याने खूप गोंधळ घातला होता आणि त्याच्यावर चेन्नई पोलिस ठाण्यात शांतता भंगाचा गुन्हाही दाखल झाला होता.