बाप तसा बेटा! शाहरुखच्या लेकानं थेट केली पप्पांची कॉपी; 10 वर्षांच्या अबरामचा अभिनय पाहून थक्क झाले फॅन्स
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
शाहरुख प्रमाणेच त्याच्या मुलांचीही फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. नुकतंच त्याची लेक सुहानाने 'द आर्चिज' मधून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. पण सुहानापेक्षा जास्त लक्ष आता शाहरुखच्या धाकट्या लेकाने वेधलं आहे. नुकतंच शाहरुख खानचा लहान मुलगा अबरामचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई, 16 डिसेंबर : शाहरुख खान सध्या त्याच्या 'डंकी' या चित्रपटासाठी चर्चेत आहे पठाण आणि जवान ब्लॉकबस्टर झाल्यानंतर या चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मात्र, शाहरूख असा सुपरस्टार आहे की, ज्याचे चित्रपट फ्लॉप असो की हिट, याने चाहत्यांना काही फरक पडत नाही. किंग खानच्या लोकप्रियतेत कधीच कमतरता येत नाही. त्याच्या हात पसरून केलेल्या आयकॉनिक पोझवर लाखो चाहते घायाळ होतात. शाहरुख प्रमाणेच त्याच्या मुलांचीही फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. नुकतंच त्याची लेक सुहानाने 'द आर्चिज' मधून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. पण सुहानापेक्षा जास्त लक्ष आता शाहरुखच्या धाकट्या लेकाने वेधलं आहे. नुकतंच शाहरुख खानचा लहान मुलगा अबरामचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नुकतंच काल म्हणजे 15 डिसेंबर रोजी अभिनेता शाहरुख खान पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खानसोबत धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात सहभागी झाला होता. शाहरुखचा धाकटा मुलगा अबराम हा या शाळेचा विद्यार्थी आहे. अबराम एका नाटकात सहभागी झाला होता, तेव्हा त्याने या नाटकात थेट आपल्या बाबांचीच कॉपी केली. त्याने हात पसरत शाहरुख खानची आयकॉनिक पोझ देत सगळ्यांचंच लक्ष वेधलं. छोटा अबराम शाहरुखची पोज देताना म्हणाला, 'हग मी, मला मिठी आवडते.' त्याचवेळी बॅकग्राउंडमध्ये 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चं गाणं वाजू लागतं. यावर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या शाहरुख खाननेही प्रतिक्रिया दिली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
शाहरुख खान युनिव्हर्स फॅन क्लब अर्थात ट्विटरच्या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अबराम स्टेजवर एक नाटक करताना दिसत आहे. तर वडील शाहरुख खान, आई गौरी खान आणि बहीण सुहाना खान त्याला चिअर करताना दिसत आहेत. दरम्यान, अबराम जेव्हा त्याच्या वडिलांची आयकॉनिक पोज देतो तेव्हा शाहरुख खान आनंदाने हात वर करताना दिसतो. आपल्या लेकाला आपलीच पोज देताना पाहून शाहरुखचा ऊर अभिमानानं भरून आला होता. या व्हिडिओला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.
advertisement
advertisement
हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे. अबरामलाच्या अभिनयाने नेटकरी प्रभावित झाले. तर काही जण त्याची तुलना सुहानाच्या अभियासोबत करत आहेत.
दरम्यान, शाहरुख खानच्या या वर्षातील तिस-या चित्रपट 'डंकी' ची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. 'डंकी'मध्ये शाहरुख खान सोबत तापसी पन्नू, बोमन इराणी, विक्की कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर हे कलाकार देखील दिसणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2023 4:43 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बाप तसा बेटा! शाहरुखच्या लेकानं थेट केली पप्पांची कॉपी; 10 वर्षांच्या अबरामचा अभिनय पाहून थक्क झाले फॅन्स