Aishwarya Rai: "ती माझी मुलगी नाहीए..." ऐश्वर्या रायबद्दल जया बच्चन स्पष्टच बोलल्या, VIDEO VIRAL

Last Updated:

जया बच्चनचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्या स्पष्टपणे म्हणतात की ऐश्वर्या ही तिची मुलगी नसून त्यांची सून आहे.

जया बच्चनचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्या स्पष्टपणे म्हणतात की ऐश्वर्या ही तिची मुलगी नसून त्यांची सून आहे.
जया बच्चनचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्या स्पष्टपणे म्हणतात की ऐश्वर्या ही तिची मुलगी नसून त्यांची सून आहे.
Jaya Bachchan on Aishwarya Rai: अनेक महिन्यांपासून बच्चन कुटुंबात तेढ निर्माण झाल्याची चर्चा होती. अशीही चर्चा आहे की ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत वेगळी राहत आहे. इतक्या अफवा असूनही या संपूर्ण प्रकरणावर बच्चन कुटुंबीयांनी मौन पाळले आहे. लोकांना शंका आहे की या अफवा खऱ्या आहेत, कारण अभिषेक आणि ऐश्वर्या दोघेही एकमेकांशिवाय सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहतात. इतकंच नाही तर खास दिवसांना कुटुंबीय सोशल मीडियावर पोस्ट करायचे, पण आता तेही लोकांना पाहायला मिळत नाही आहे.
ऐश्वर्या रायने नुकताच तिची लाडकी लेक आराध्याचा 13 वा वाढदिवस साजरा केला. या पार्टीचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी आराध्या आणि ऐश्वर्या आनंदी दिसल्या, परंतु हे फोटो पाहिल्यानंतर या कुटुंबात काहीतरी गडबड आहे हे पुन्हा एकदा नेटिझन्सच्या लक्षात आले.
advertisement
ऐश्वर्या रायने शेअर केलेल्या पोस्टमध्ये बच्चन कुटुंबातील एकही सदस्य दिसला नाही. अभिषेक बच्चनही या फोटोंमध्ये दिसला नाही. दरम्यान, जया बच्चनचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्या स्पष्टपणे म्हणतात की ऐश्वर्या ही तिची मुलगी नसून त्यांची सून आहे. यानंतर या अफवांना परत एकदा वेग आला आहे.

“ती माझी सून आहे, माझी मुलगी नाही...”

advertisement
जयाने आपल्या मुलांशी, अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांच्याशी कठोर असल्याचे कबूल केले, मात्र, ऐश्वर्यासोबतच्या नातेसंबंधाबद्दल विचारले असता, त्यांनी स्पष्ट केले, ''कठोर? ती माझी मुलगी नाही! ती माझी सून आहे. मी त्याच्याशी कठोर का वागेन? मला खात्री आहे की त्याच्या आईने तिच्यासाठी हे केले असेल.''
advertisement
ही क्लिप सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. काही लोक जयाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत आहेत, तर जयाच्या या विधानाने काहींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Aishwarya Rai: "ती माझी मुलगी नाहीए..." ऐश्वर्या रायबद्दल जया बच्चन स्पष्टच बोलल्या, VIDEO VIRAL
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement