नवऱ्यासोबत पहिल्यांदाच मशीदीमध्ये पोहोचली सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल म्हणतो, 'धर्म परिवर्तन करण्यासाठी...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sonakshi Sinha-Zaheer Iqbal : सोनाक्षीने व्लॉगमध्ये सांगितले की, ती अबुधाबी फिरण्यासाठी खूप उत्सुक आहे, कारण ती पहिल्यांदाच एखाद्या मशिदीत जाणार आहे!
मुंबई : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे सध्या बॉलिवूडमधील क्यूटेस्ट कपल म्हणून लोकप्रिय झाले आहेत. त्यांची जोडी त्यांच्या नात्यातील आंबट-गोड नोकझोकमुळे सतत चर्चेत राहते. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. विशेष विवाह कायद्यानुसार लग्न केल्यामुळे सोनाक्षीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पण या कपलने आपल्या नवीन व्लॉगद्वारे हेटर्सची बोलती बंद केली असून धर्मापेक्षा प्रेम मोठं असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
सोनाक्षीने नुकताच एक डेली व्लॉग शेअर केला, ज्यात ती जहीरसोबत अबुधाबीला गेली आहे. अबुधाबी टुरिझमच्या निमंत्रणावरून हे दोघे तिथलं निसर्गसौंदर्य एक्सप्लोर करत आहेत. व्लॉगमध्ये सोनाक्षीने सांगितले की, ती अबुधाबी फिरण्यासाठी खूप उत्सुक आहे, कारण ती पहिल्यांदाच एखाद्या मशिदीत जाणार आहे! "मी अनेक मंदिरे आणि चर्चमध्ये गेले आहे, पण मशीद कधी पाहिली नाही," असे तिने सांगितले.
advertisement
सोनाक्षीच्या उत्तरावर झहीरची भन्नाट रिॲक्शन
सोनाक्षीच्या या उत्साहावर जहीरने लगेच मिश्किल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "मी स्पष्ट सांगतो, मी तिला तिथे धर्म परिवर्तन करण्यासाठी घेऊन जात नाहीये." जहीरने पुढे स्पष्ट केले की, ते कोणत्याही धार्मिक हेतूने नव्हे, तर केवळ एक सुंदर वास्तू म्हणून मशीद पाहण्यासाठी जात आहेत, जसे आपण मंदिर किंवा चर्च पाहतो.
advertisement
जहीरच्या या स्पष्ट आणि तर्कशुद्ध बोलण्यावर प्रतिक्रिया देत सोनाक्षीने जोरात घोषणा केली, "स्पेशल मॅरेज ॲक्ट जिंदाबाद!" जहीरच्या या रिॲक्शनमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्यांच्या वेगवेगळ्या धर्मांबद्दल चर्चा सुरू झाली आहे. चाहते पुन्हा एकदा झहीरच्या हजरजबाबीपणावर फिदा झाले आहेत. चाहते धर्मापेक्षा नात्याला महत्त्व देणाऱ्या जहीरचे कौतुक करत आहेत. अनेक युजर्स त्याला 'ग्रीन फ्लॅग' आणि 'बेस्ट हसबंड' असे टॅग देत आहेत.
advertisement
सात वर्षांच्या डेटिंगनंतर सोनाक्षी-झहीरने बांधली लग्नगाठ
सोनाक्षी आणि झहीर लग्नाआधी जवळपास सात वर्षे एकमेकांना गुपचूप डेट करत होते. अखेर, २३ जून २०२४ रोजी स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार हे जोडपं लग्नबंधनात अडकलं. सुरूवातीला त्यांना प्रचंड ट्रोलिंगला जावं लागलं होतं. पण आता या जोडप्याने त्यांच्या हेटर्सनाही त्यांचं फॅन्स बनवलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 3:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच मशीदीमध्ये पोहोचली सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल म्हणतो, 'धर्म परिवर्तन करण्यासाठी...'


